Soybean with AI : धाराशिवमध्येशेतीला मिळाली डिजिटल गती मिळाली आहे. उपळा गावात सुरू झालेल्या देशातील पहिल्या AI पायलट प्रोजेक्ट अंतर्गत हवामान आणि मातीच्या सेन्सरमुळे शेतकऱ्यांना तासोपतास शेतीचं नियोजन मोबाईलवर मिळतंय. (Soybean with AI)
यामुळे सोयाबीन उत्पादनात लक्षणीय वाढीसह पाण्याचा वापर आणि रोग नियंत्रण अधिक अचूक होणार आहे. भारतीय शेतीत आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर प्रत्यक्षात सुरू झाला आहे. (Soybean with AI)
देशातील पहिल्या AI आधारित पायलट प्रोजेक्टचा प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील उपळा गावात करण्यात आला आहे. हा प्रयोग सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत असून, यामुळे शेतीत तांत्रिक बदलांची नवी दिशा तयार होत आहे. (Soybean with AI)
AI कसा करतो शेतीचं मार्गदर्शन?
या प्रकल्पात एक वेदर स्टेशन बसवण्यात आले असून ते २० किलोमीटर परिघातील वातावरणातील क्षणाक्षणाच्या बदलांची माहिती संकलित करते.
या माहितीचा थेट अहवाल राहुरी कृषी विद्यापीठाला पाठवला जातो.
विद्यापीठातील तज्ज्ञ या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून शेती नियोजन सांगतात
दर तासाला हवामान अपडेट्स, कीड व रोग नियंत्रणाची माहिती मिळते
यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेवर फवारणी, खत व्यवस्थापन, सिंचन नियोजन करता येते.
शेतात 'स्मार्ट सेन्सर'; जमिनीतील बदलावर लक्ष
* या प्रकल्पाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सॉईल सेन्सर.
* उपळा गावातील १० शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या जमिनींमध्ये हे सेन्सर बसवले आहेत.
* हे सेन्सर ओलावा, पाण्याचा ताण, पोत यांसारखी माहिती वेळोवेळी नोंदवतात.
* यामुळे कोणत्या भागात किती सिंचन आवश्यक आहे याचे निर्णय अधिक अचूकपणे घेता येतात.
* यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो, आणि पिकाची वाढ सुधारते.
रोगांचा अंदाज आधीच मिळणार
AI प्रणाली शेतातील परिस्थितीचे विश्लेषण करून बुरशीजन्य रोग आणि कीड प्रादुर्भावाचा अंदाज ३-४ दिवस आधी देते. त्यामुळे आधीच रोगाचा इशारा मिळाल्याने कोणती फवारणी, केव्हा करायची हे समजतं आणि नुकसान टळण्यास मदत मिळेल.
डिजिटल शेतीची नांदी
* या प्रकल्पातील सर्व मोजमाप, अचूक नोंदी, वेळोवेळी अपडेट्स हे डिजिटली ट्रॅक केले जात आहे.
* यामुळे शेतकऱ्यांचा डेटा सुरक्षित राहतो.
* तांत्रिक सल्ला वैयक्तिक पातळीवर देता येतो.
* शेतात 'डिसिजन बेस्ड शेती' शक्य होते.
देशभरात या प्रयोगाची दखल
उपळा गावातील हा AI प्रयोग शेतीतील ऐतिहासिक पायरी ठरत आहे. यशस्वी ठरल्यास याच मॉडेलचा वापर इतर राज्यांतील शेतकऱ्यांसाठीही केला जाणार आहे.
हा प्रकल्प केवळ शेतीच नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल, असं मत कृषी विभागातील अधिकाऱ्यांचं आहे.
AI च्या मदतीने शेती आता जास्त अचूक, शाश्वत आणि उत्पादनक्षम होत आहे. धाराशिव जिल्ह्यातून सुरू झालेली ही चळवळ भविष्यात भारतीय कृषी प्रणालीत मोठा बदल घडवून आणण्याची मदत करेल.