Soybean Varieties Research : अमरावती येथील सोयाबीन प्रादेशिक अनुसंधान केंद्रात पीडीकेव्हीद्वारे विकसित ४४ सोयाबीन वाणांची एकाच ठिकाणी लागवड करण्यात आली आहे. (Soybean Varieties Research)
‘व्हेरायटल कॅफेटेरिया’ या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना विविध वाणांचे गुणधर्म जाणून घेऊन आपल्या शेतासाठी योग्य वाण निवडण्याची संधी मिळत आहे.(Soybean Varieties Research)
सोयाबीन संशोधन क्षेत्रात नवा प्रयोग म्हणून अमरावती येथील सोयाबीन प्रादेशिक अनुसंधान केंद्रात पीडीकेव्हीद्वारे विकसित सोयाबीनच्या तब्बल ४४ वाणांची एकाच ठिकाणी लागवड करण्यात आली आहे. (Soybean Varieties Research)
या विशेष प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी भेट दिली.(Soybean Varieties Research)
वाणांचा प्रत्यक्ष अभ्यास
प्रादेशिक अनुसंधान केंद्रातील 'व्हेरायटल कॅफेटेरिया' प्रकल्पांतर्गत मध्य व दक्षिण विभागातील शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या सोयाबीनच्या सर्व वाणांची लागवड प्रात्यक्षिकरूपाने करण्यात आली आहे.
डॉ. सिंघल यांनी संशोधकांकडून प्रत्येक वाणाची उत्पादनक्षमता, रोग-कीड प्रतिकारशक्ती आणि हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता याबाबत सविस्तर माहिती घेतली.
त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, या केंद्रावर भेट देऊन वाणांचे गुणधर्म समजून घ्या आणि आपल्या प्रदेशासाठी योग्य वाण निवडून उत्पादनात वाढ करा.
संशोधनाची परंपरा
अमरावतीतील हे प्रादेशिक अनुसंधान केंद्र अ.भा. समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्पाचे महत्त्वाचे केंद्र आहे. आतापर्यंत या केंद्राने शेतकऱ्यांसाठी ६ सुधारित वाण व ३६ संशोधनाधारित शिफारशी उपलब्ध करून दिल्या आहेत. नव्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना वाण निवडीची वैज्ञानिक माहिती एका ठिकाणी मिळण्याची सोय झाली आहे.
उपस्थित मान्यवर
या पाहणी कार्यक्रमाला संचालक (संशोधन) डॉ. श्यामसुंदर माने, संचालक (शिक्षण व विस्तार) डॉ. धनराज उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, यवतमाळचे एसएओ संतोष डाबरे, अकोल्याचे एसएओ शंकर किरवे, प्रादेशिक अनुसंधान केंद्राचे प्रमुख डॉ. सतीश निचळ, कृषी उपसंचालक तरुण देशमुख तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी संधी
या 'व्हेरायटल कॅफेटेरिया'च्या माध्यमातून शेतकरी उत्पादनक्षम वाणांची तुलना करून हवामान व जमिनीच्या परिस्थितीनुसार योग्य वाण निवडू शकतील, तसेच संशोधनकेंद्राच्या शिफारशींचा लाभ घेऊन उत्पादनवाढ व नफ्यात भर घालू शकतील.
हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : पावसाचा जोर कायम; शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी? वाचा सविस्तर