Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीला गती; यंदा प्रत्येक पोत्यावर क्यूआर कोड, मर्यादाही वाढली

Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीला गती; यंदा प्रत्येक पोत्यावर क्यूआर कोड, मर्यादाही वाढली

latest news Soybean Kharedi: Soybean purchase accelerates; This year, QR code on every bag, limit also increased | Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीला गती; यंदा प्रत्येक पोत्यावर क्यूआर कोड, मर्यादाही वाढली

Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीला गती; यंदा प्रत्येक पोत्यावर क्यूआर कोड, मर्यादाही वाढली

Soybean Kharedi : धाराशिव जिल्ह्यातील ३२ हमीभाव केंद्रांवर सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी यंदा नव्या तांत्रिक पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शेकडो नोंदणीकृत शेतकऱ्यांना एसएमएस (SMS) पाठवण्यात आले असून, विशेष म्हणजे यंदा प्रत्येक पोत्याचे माप क्यूआर कोड स्कॅन करून घेतले जाणार आहे. (Soybean Kharedi)

Soybean Kharedi : धाराशिव जिल्ह्यातील ३२ हमीभाव केंद्रांवर सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी यंदा नव्या तांत्रिक पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शेकडो नोंदणीकृत शेतकऱ्यांना एसएमएस (SMS) पाठवण्यात आले असून, विशेष म्हणजे यंदा प्रत्येक पोत्याचे माप क्यूआर कोड स्कॅन करून घेतले जाणार आहे. (Soybean Kharedi)

Soybean Kharedi : धाराशिव जिल्ह्यातील ३२ हमीभाव केंद्रांवर सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीची औपचारिक सुरुवात झाली असून, या वर्षीच्या खरेदी प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि तांत्रिक बनवण्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे. (Soybean Kharedi)

शेतकऱ्यांनी आणलेल्या प्रत्येक पोत्यावर आता क्यूआर कोड लावला जाणार आहे, ज्यामुळे पोत्याचे मोजमाप, साठवणूक आणि गोदामापर्यंतचा प्रवास ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहे.(Soybean Kharedi)

नाफेडकडून सर्व केंद्रांवर तांत्रिक प्रक्रिया अपडेट करण्यात येत असून, सोमवारपासून प्रत्यक्ष खरेदीला वेग येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देत यंदा सोयाबीन खरेदीची मर्यादा १६ वरून १७ क्विंटल प्रतिहेक्टर करण्यात आली आहे.(Soybean Kharedi)

क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता

नाफेडने (NAFED) यासाठी सर्व केंद्रांवरील तांत्रिक प्रक्रिया अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे.

क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे फायदे

* प्रत्येक पोत्याचे अचूक वजन नोंदवले जाईल

* गोदामात पोहोचेपर्यंत त्या पोत्याचा संपूर्ण डेटा उपलब्ध राहील

* चुका, फेरफार, अनियमितता रोखली जाणार

* शेतकऱ्यांच्या मालाची हरवण्या-गहाळ होण्याची शक्यता कमी

* सोमवारपासून प्रत्यक्ष मालाचे माप मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना संदेश पाठवणे सुरू

१५ नोव्हेंबरपासून खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेकडो शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी एसएमएस (SMS) पाठविण्यात आले आहेत. केंद्राने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, मेसेज मिळाल्यानंतरच माल केंद्रावर आणावा, अन्यथा अनावश्यक गर्दी होईल.

यंदा महत्त्वाचा बदल 

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे सरकारने महत्त्वाचा दिलासा दिला आहे.

गतवर्षीची मर्यादा: १६ क्विंटल/हेक्टर

यावर्षी वाढवून: १७ क्विंटल/हेक्टर

हा निर्णय शेतकऱ्यांच्या मागणीनुसार घेण्यात आला असून, उत्पादन कमी असूनही त्यांचा माल खरेदी होण्यासाठी ही वाढ मोठा फायदा ठरणार आहे.

सोयाबीन खरेदी दर: ५,३२८ रु. प्रति क्विंटल

जिल्ह्यातील ३१ केंद्रांवर सोयाबीन ५,३२८ हमीभावाने खरेदी केली जाणार असून, तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दुहेरी फटका

धाराशिव जिल्हा सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असला तरी यंदा अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादकतेत घट झाल्याने व्याजाचा वाढलेला ताण आणि योग्य केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांची मनमानी सुरु आहे. या सर्वांमुळे शेतकरी अडचणीत आहेत.

डिजिटल पारदर्शकतेकडे एक मोठे पाऊल 

* शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल

* खरेदीतील गोंधळ कमी होईल

* भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता येईल

* प्रक्रिया जलद आणि व्यवस्थित होईल

धाराशिव जिल्ह्यातील ही तांत्रिक सुधारणा राज्यभरातील खरेदी केंद्रांसाठी आदर्श ठरू शकते.

सोयाबीनची साल जलद वेळेत द्यावी. माल खरेदीला उशीर लागत असल्याने व्याज वाढत आहे. वेळेवर पैसे दिले पाहिजेत.- सुरेंद्र झांबरे, शेतकरी

यंदा प्रत्येक पोत्यावर क्यूआर कोड लावला जाणार आहे. मापापासून ते गोदामापर्यंत पोत्याची अचूक माहिती मिळेल. शेतकऱ्यांनी मेसेज मिळाल्यानंतरच माल आणावा.- दीपक शेलार, खरेदी केंद्र, धाराशिव

हे ही वाचा सविस्तर  : Til Market Update: तीळ उत्पादनावर पावसाची ‘संक्रांत’; दरवाढीची शक्यता पुन्हा वाढली!

Web Title: latest news Soybean Kharedi: Soybean purchase accelerates; This year, QR code on every bag, limit also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.