Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीचं वेळापत्रक बदललं; शेतकऱ्यांना 'एसएमएस'ची प्रतीक्षा

Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीचं वेळापत्रक बदललं; शेतकऱ्यांना 'एसएमएस'ची प्रतीक्षा

latest news Soybean Kharedi: Soybean procurement schedule changed; Farmers await SMS | Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीचं वेळापत्रक बदललं; शेतकऱ्यांना 'एसएमएस'ची प्रतीक्षा

Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीचं वेळापत्रक बदललं; शेतकऱ्यांना 'एसएमएस'ची प्रतीक्षा

Soybean Kharedi : अमरावती जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार होती; मात्र हेक्टरी उत्पादकता उशिरा जाहीर झाल्याने प्रत्यक्ष खरेदी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक केंद्रांवर काटापूजन आणि उद्घाटनाची तयारी पार पडली असली तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी आता सोमवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (Soybean Kharedi)

Soybean Kharedi : अमरावती जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार होती; मात्र हेक्टरी उत्पादकता उशिरा जाहीर झाल्याने प्रत्यक्ष खरेदी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक केंद्रांवर काटापूजन आणि उद्घाटनाची तयारी पार पडली असली तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी आता सोमवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (Soybean Kharedi)

Soybean Kharedi : अमरावती जिल्ह्यातील १५ शासन खरेदी केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदी सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली होती. मात्र, शासनाने हेक्टरी उत्पादकता उशिरा कळवल्यामुळे प्रत्यक्ष खरेदीचा मुहूर्त हुकला आहे.(Soybean Kharedi)

खरेदी केंद्रांवर काटापूजन आणि उद्घाटनाची औपचारिकता पार पडली असली तरी सोमवार, १७ नोव्हेंबरपासूनच खरी खरेदी सुरू होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.(Soybean Kharedi)

पोर्टल अपडेशनमुळे एसएमएस (SMS) शेड्युलिंगला अडथळे येत असून ८ हजार ३७३ नोंदणीकृत शेतकरी खरेदीची अपेक्षा धरून आहेत.(Soybean Kharedi)

सोयाबीन खरेदीच्या उशीरा निर्णयामुळे शेतकरी हमीभावापासून वंचित राहू नयेत, याची काळजी प्रशासनाने आता तत्परतेने घेण्याची गरज आहे.

सोमवारपासून खरेदी सुरू झाल्यावर गाळेवरील गर्दी टाळण्यासाठी आणि पारदर्शक व्यवहारासाठी शेड्युलिंग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

खाजगी बाजारात भाव कोसळले, शेतकऱ्यांना हमीभावाची गरज

खासगी व्यापारी सध्या सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार ५०० रुपये कमी किमतीत करत आहेत. त्यामुळे शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासनाची आधारभूत किमतीची (MSP) खरेदी अत्यंत आवश्यक झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

फक्त काटापूजनच झाले; उद्घाटनही शांतपणे

१५ नोव्हेंबरला खरेदीचा प्रारंभ मानून अनेक केंद्रांवर काटापूजन करण्यात आले. नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने गाजावाजा टाळत फक्त औपचारिक उद्घाटन करण्यात आल्याची माहिती मिळते.

मात्र, उत्पादकतेची अधिकृत माहिती शनिवारीच मिळाल्याने कोणत्याही केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू होऊ शकली नाही.

उत्पादकता उशिरा मिळाली, आता SMS वर शेड्युलिंग

जिल्ह्यातील DMO आणि VCMF केंद्रांना शनिवारी उत्पादकता कळविण्यात आली.

शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे खरेदीची तारीख व वेळ कळवली जाईल

पोर्टल अपडेटच्या कामामुळे SMS पाठवण्यात अडचणी येत आहेत

त्यामुळे शेड्युलिंगची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे

८ हजार ३७३ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली असून अजून ३ हजारांहून अधिक ऑफलाइन अर्ज ऑनलाइन करायचे बाकी आहेत.

जिल्हानिहाय सोयाबीन उत्पादकता (हेक्टरी किलोमध्ये)

अमरावती : १७१० किलो

यवतमाळ : १४३० किलो

अकोला : १४५० किलो

वाशीम : २०४० किलो (सर्वाधिक)

बुलढाणा : १५१० किलो

याच उत्पादकतेच्या आधारावर शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे.

सर्व केंद्रांवर तयारी पूर्ण

सोयाबीन खरेदीसाठीची उत्पादकता सर्व केंद्रांना मिळाली आहे. आता खरेदीसाठी शेड्युलिंग होत आहे. सोयाबीन खरेदीसाठी काटापूजन होऊन सर्व केंद्रांवर आवश्यक तयारी झालेली आहे.- अजय बिसणे, जिल्हा विपणन अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Soyabean Kharedi : सोयाबीन हमीभाव खरेदी रखडली; शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदणीत विलंब

Web Title : सोयाबीन खरीद केंद्रों पर केवल काटा पूजन किया गया।

Web Summary : अमरावती में सोयाबीन खरीद में देरी; केंद्रों पर प्रतीकात्मक अनुष्ठान किए गए। किसान पंजीकरण जारी है। खरीद जिला-वार उत्पादकता पर निर्भर करती है, जो शेड्यूलिंग के बाद जल्द ही शुरू होगी। सिस्टम अपडेट के कारण देरी हुई।

Web Title : Soybean purchase centers perform symbolic weighing scale worship only.

Web Summary : Soybean procurement in Amravati delayed; centers performed symbolic rituals. Farmer registration ongoing. Purchase depends on district-wise productivity, starting soon after scheduling. System updates caused delays.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.