Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Kharedi : हमीभाव केंद्रांवर मोठी खरेदी; पण सर्वांना वेळेवर चुकारे मिळाले का?

Soybean Kharedi : हमीभाव केंद्रांवर मोठी खरेदी; पण सर्वांना वेळेवर चुकारे मिळाले का?

latest news Soybean Kharedi : Big purchase at guaranteed price centers; But did everyone get their dues on time? | Soybean Kharedi : हमीभाव केंद्रांवर मोठी खरेदी; पण सर्वांना वेळेवर चुकारे मिळाले का?

Soybean Kharedi : हमीभाव केंद्रांवर मोठी खरेदी; पण सर्वांना वेळेवर चुकारे मिळाले का?

Soybean Kharedi : परभणी जिल्ह्यात हमीभाव केंद्रांवर तब्बल ३३.५१ कोटी रुपयांची सोयाबीन खरेदी झाली आहे. ३२२७ शेतकऱ्यांचे चुकारे अदा झाले असले तरी सुमारे १०० शेतकऱ्यांचे पैसे अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, हरभरा खरेदीसाठी १ ते ३१ मार्चदरम्यान नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.(Soybean Kharedi)

Soybean Kharedi : परभणी जिल्ह्यात हमीभाव केंद्रांवर तब्बल ३३.५१ कोटी रुपयांची सोयाबीन खरेदी झाली आहे. ३२२७ शेतकऱ्यांचे चुकारे अदा झाले असले तरी सुमारे १०० शेतकऱ्यांचे पैसे अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, हरभरा खरेदीसाठी १ ते ३१ मार्चदरम्यान नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.(Soybean Kharedi)

Soybean Kharedi : परभणी जिल्ह्यात शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ३३.५१ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे.(Soybean Kharedi)

एकूण ३ हजार २२७ शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात आले असून सुमारे १०० शेतकऱ्यांचे जवळपास ८ लाख रुपये वितरण शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाने दिली.(Soybean Kharedi)

९ खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी

शासनाने ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात ९ खरेदी केंद्र सुरू केली होती. या केंद्रांवरून ११ हजार ७५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणीकृत शेतकऱ्यांना संदेश पाठवून सोयाबीन आणण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मात्र, आर्द्रतेचे निकष, मोजणीतील विलंब आणि चुकारे वेळेवर मिळतील की नाही, या शंकांमुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली.

तरीही ३३१९ शेतकऱ्यांनी हजेरी लावत ६३ हजार २५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले. त्यापैकी ६३ हजार २ क्विंटल सोयाबीन वेअरहाऊसमध्ये जमा करण्यात आले आहे.

केंद्रनिहाय खरेदीचा आढावा (क्विंटलमध्ये)

केंद्रखरेदी (क्विंटल)रक्कम (कोटी रुपये)
परभणी४३४४२.३१
मानवत३०००१.५९
पाथरी७८६०४.१८
पूर्णा६९८५३.७२
सोनपेठ१०६८९५.६९
बोरी१६१७९८.६२
वरपूड११८६०.६३
झरी४४५७२.३७
एकूण६२,९०९३३.५१

हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू

जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी नाफेडमार्फत ८ ठिकाणी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. नाफेड (NAFED) मार्फत जिंतूर, पूर्णा, मानवत, सोनपेठ, बोरी, परभणी, वरपूड आणि झरी येथे खरेदी होणार आहे.

हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला असून १ ते ३१ मार्चदरम्यान ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा व पीकपेरा आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांना आवाहन

प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, हरभरा खरेदीसाठी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह केंद्रांवर हजेरी लावावी, जेणेकरून हमीभावाचा लाभ घेता येईल.

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : आवक वाढली पण भावात तफावत; कोणत्या हरभऱ्याला सर्वाधिक मागणी? वाचा सविस्तर

अधिक वाचा :Chana Procurement : हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून हमीदराने खरेदी सुरू

Web Title : सोयाबीन खरीद: एमएसपी केंद्रों पर बड़ी खरीद, समय पर भुगतान मिला?

Web Summary : परभणी जिले में एमएसपी पर सोयाबीन खरीद को अच्छी प्रतिक्रिया मिली, ₹33.51 करोड़ की खरीद हुई। अधिकांश किसानों को भुगतान मिला, लेकिन कुछ के लिए ₹8 लाख लंबित हैं। नौ केंद्र संचालित, लेकिन कुछ किसान नमी, देरी और भुगतान चिंताओं के कारण हिचकिचाए।

Web Title : Soybean Procurement: Large Purchases at MSP Centers, Timely Payments?

Web Summary : Parbhani district saw good response to soybean procurement at MSP, with ₹33.51 crore purchased. Most farmers received payments, but ₹8 lakh is pending for some. Nine centers operated, but some farmers hesitated due to moisture, delays, and payment concerns.