Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Crop Protection : फुलोऱ्यातील सोयाबीनला चक्रीभुंग्याचा फटका; अळी रोखण्यासाठी करा 'या' उपाययोजना

Soybean Crop Protection : फुलोऱ्यातील सोयाबीनला चक्रीभुंग्याचा फटका; अळी रोखण्यासाठी करा 'या' उपाययोजना

latest news Soybean Crop Protection: Soybeans in the flowerbed are affected by the cyclone; Take these measures to prevent the caterpillars | Soybean Crop Protection : फुलोऱ्यातील सोयाबीनला चक्रीभुंग्याचा फटका; अळी रोखण्यासाठी करा 'या' उपाययोजना

Soybean Crop Protection : फुलोऱ्यातील सोयाबीनला चक्रीभुंग्याचा फटका; अळी रोखण्यासाठी करा 'या' उपाययोजना

Soybean Crop Protection : सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळे कीड नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले असून, शेतकरी महागड्या किटकनाशकांवर खर्च करून पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Soybean Crop Protection)

Soybean Crop Protection : सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळे कीड नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले असून, शेतकरी महागड्या किटकनाशकांवर खर्च करून पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Soybean Crop Protection)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Crop Protection : सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे.(Soybean Crop Protection)

लातूर जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार हेक्टरवरील सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. (Soybean Crop Protection)

बदलत्या वातावरणामुळे कीड नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले असून, शेतकरी महागड्या किटकनाशकांवर खर्च करून पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.(Soybean Crop Protection)

पुष्य नक्षत्रातील सरींमुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. वातावरणात बदल झाल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. (Soybean Crop Protection)

सध्या सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, बहुतांश ठिकाणी पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी किटकनाशक फवारणीसाठी धडपड करीत आहेत.(Soybean Crop Protection)

मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणच्या शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. मध्यंतरीच्या महिनाभराच्या कालावधीत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागून होते. (Soybean Crop Protection)

पुष्य नक्षत्रात पाऊस झाल्याने कोमेजून जाणाऱ्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गत आठवड्यापासून आश्लेषा नक्षत्रास प्रारंभ झाला असून, सतत वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे पिकांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अळी, किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा नियंत्रणासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.(Soybean Crop Protection)

बाजारात महागामोलाचे किटक नाशक, औषधे खरेदी करून फवारणी करीत आहेत. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे.(Soybean Crop Protection)

सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत

सध्या सोयाबीन पीक वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. बहुतांश ठिकाणच्या सोयाबीनवर पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागडी औषधी, किटकनाशके खरेदी करून फवारणी करीत आहेत.

सोयाबीनवर भिस्त

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २३८.८ मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस लातूर तालुक्यात असून, १८९.८ मिमी आहे.

१०० टक्के जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या

पीकहेक्टर (हे.)
सोयाबीन४,८५,१८१
तूर७०,६६७
मूग७,१९७
उडीद६,१८३
मका३,८०७
कापूस९,३७७

तूर फुटवे फुटण्याच्या अवस्थेत

जिल्ह्यात खरिपाचा ५ लाख ८८ हजार ९९६ हेक्टरवर पेरा झाला आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार १८१ हेक्टरवर झाला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र सोयाबीनवर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होऊ नये, म्हणून शेतकरी वेळीच फवारणी, खतांचे डोस देत आहेत.

सोयाबीन पाठोपाठ तुरीचा जिल्ह्यात पेरा आहे. पुरेशा पावसामुळे हे पीक वाढीच्या आणि फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. सध्या या पिकावर कुठल्याही किडीचा अथवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

सोयाबीनवर पाने खाणारी अळी, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क व प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. - दीपक सुपेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी.

नियंत्रणासाठी उपाय

प्रतिबंधात्मक उपाय

* पीक फेरपालट (Crop rotation) करा.

* रोगमुक्त वाण किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर.

* लागवडीपूर्वी बियाण्यांना शिफारस केलेल्या बुरशीनाशक/जैविक उपचार (Trichoderma, Pseudomonas इ.) करावेत.

जैविक नियंत्रण

* रोग/किडींचे नैसर्गिक शत्रू जपणे.

* Neem-based कीटकनाशकांचा वापर.

हे ही वाचा सविस्तर : Chilli Crop Protection : उन्हाळी मिरचीचे नुकसान वाढले; खर्च जास्त, भाव कमी वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Crop Protection: Soybeans in the flowerbed are affected by the cyclone; Take these measures to prevent the caterpillars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.