Lokmat Agro >शेतशिवार > Soyabean Kharedi : सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं?

Soyabean Kharedi : सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं?

Latest News Soyabean Kharedi The bank's IFSC code was wrong at soybean purchasing center, see details | Soyabean Kharedi : सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं?

Soyabean Kharedi : सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं?

Soyabean Kharedi : शेतकरी नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने (Nafed Soyabean Buying Center) सोयाबीनची विक्री करत आहेत.

Soyabean Kharedi : शेतकरी नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने (Nafed Soyabean Buying Center) सोयाबीनची विक्री करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

अकोला : शेतकऱ्यांनो, तुम्ही जर सोयाबीन विक्री (S0yabean Buying) करत असाल तर बँक खात्याची बिनचूक द्या. अन्यथा तुम्हालाही या शेतकऱ्यांसारखा भुर्दंड सहन करावे लागेलं. सोयाबीन विक्री दरम्यान शेतकऱ्यांनी बँक खात्याची (bank details) माहिती भरताना बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा टाकल्याने पैसे मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. हा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. 

शेतकरी नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने (Nafed Soyabean Buying Center) सोयाबीनची विक्री करत आहेत. शेतकऱ्याला संपूर्ण माहिती द्यावी लागत आहे. बँकेची माहिती देताना घोळ होत असल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रात हा प्रकार घडला आहे. सोयाबीन विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती टाकताना आयएफएससी कोडमध्ये 'शून्या' ऐवजी इंग्रजी अक्षर 'ओ' टाकल्याने दीड महिना होऊनही २७ शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीनची रक्कम जमा झाली नाही. 

दरम्यान संबंधित कार्यालयातील चुकीमुळे शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारावा लागत आहेत. नाफेडकडून वाडेगावच्या केंद्रात सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली होती. याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून बैंक पासबुकची झेरॉक्स व इतर कागदपत्रे जमा केली होती. मात्र बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा टाकल्याने शेतकऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. 

अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी 
खरेदी-विक्री कार्यालयातील कर्मचाऱ्याने शेतकयांची मोबाइलवरुन माहिती घेऊनही नाफेडच्या संबंधित अधिकारी-कर्मचायांनी माहिती भरताना आयएफएससी कोडमध्ये 'शून्या ऐवजी 'ओ टाकला. आता शेतकऱ्यांना कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. मुंबईतील नाफेड कार्यालयातून खात्यात पैसे जमा होतील, असे मोघम उत्तर मिळत आहे.

बुलढाण्यातही असाच प्रकार 
काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातही असाच प्रकार घडला. अतिवृष्टीनंतर शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्याची माहिती भरताना आयएफएससी कोडमध्ये 'शून्या ऐवजी इंग्रजी अक्षर 'ओ' टाकल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमच जमा झाली नव्हती. महसूल कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला.

Web Title: Latest News Soyabean Kharedi The bank's IFSC code was wrong at soybean purchasing center, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.