Lokmat Agro >शेतशिवार > Solar Pump Yojana : अर्ज केले, व्हेंडर निवडले, पैसे भरले, तरी सौर पंप येईना घरी...

Solar Pump Yojana : अर्ज केले, व्हेंडर निवडले, पैसे भरले, तरी सौर पंप येईना घरी...

Latest News Solar pump Yojana Even after four months, company has not supplied solar pump | Solar Pump Yojana : अर्ज केले, व्हेंडर निवडले, पैसे भरले, तरी सौर पंप येईना घरी...

Solar Pump Yojana : अर्ज केले, व्हेंडर निवडले, पैसे भरले, तरी सौर पंप येईना घरी...

Solar Pump Yojana : या योजनेंतर्गत अनेक कंपन्या शेतकऱ्यांना शुल्क भरणा, कंपनी निवडूनही सौर पंप बसविण्यास टाळाटाळ करीत आहेत.

Solar Pump Yojana : या योजनेंतर्गत अनेक कंपन्या शेतकऱ्यांना शुल्क भरणा, कंपनी निवडूनही सौर पंप बसविण्यास टाळाटाळ करीत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली 'मागेल त्याला सौर कृषिपंप' ही योजना (Solar Pump Yojana) राज्य सरकारने सुरू केली आहे. मात्र पैसे भरून चार महिने झाले तरी कंपनीकडून सौर पंपाचा पुरवठा केला जात नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विनामूल्य वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३, ५ आणि ७.५ एचपी क्षमतेचे पंप दिले जातात. या पंपाचा पुरवठा करण्यासाठी अनेक कंपन्या उपलब्ध आहेत.

मागील अनेक महिन्यापासून तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी शुल्क भरणा करून कंपनीचीही निवड केली आहे. मात्र अशा शेतकऱ्यांना जवळपास दोन ते तीन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही सौर पंप दिला जात नसल्याने ही योजना मृगजळ ठरल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांना महावितरण कंपनी दिवसा व रात्री अशा सत्रात शेतीसाठी ८ तास वीजपुरवठा देते, तोही कमी दाबाचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचण येत होती. परंतु दिवसा वीज उपलब्ध व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री शेतात पिकांना पाणी देताना अनेक हिंस्र प्राणी, साप, आर्दीपासून जीविताला धोका उत्पन्न होणार नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले होत. यासाठी राज्य शासनाने 'मागेल त्याला सौर पंप' ही योजना आणली.

क्षेत्रानुसार मिळतोय क्षमतेचा सौर कृषी पंप
मागेल त्याला सौर पंप या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४० आर. ते १ हेक्टर क्षेत्रासाठी ३ एचपीचा पंप खर्च २२,९७५ रुपये १ ते २ हेक्टरसाठी ५ एचपीचा पंप ३२ हजार १०० व ५ हेक्टर पेक्षाजास्त ७.५ एचपीचा पंप ४५ हजार रुपये शुल्क भरून सौर पंप उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची गरज नाही.

विशिष्ट प्रवर्गानुसार भरावी लागतेय रक्कम
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप किमतीच्या १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांना ५ टक्के रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जातो. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते. परंतु या योजनेंतर्गत अनेक कंपन्या शेतकऱ्यांना शुल्क भरणा, कंपनी निवडूनही सौर पंप बसविण्यास टाळाटाळ करीत आहेत.


'मागेल त्याला सौर पंप' या योजनेंतर्गत मी ३ एचपी पंपासाठी अर्ज केला होता व मंजूरही झाला. त्यासाठी मी नियमानुसार शुल्क भरणा करून कंपनीचीही निवड एप्रिल २५ मध्ये केली; परंतु अद्यापही सौर पंप बसविण्यात आलेला नाही.
- किशोर पाटील, शेतकरी, महिंदळे

Web Title: Latest News Solar pump Yojana Even after four months, company has not supplied solar pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.