Lokmat Agro >शेतशिवार > Solar Energy : अकोल्यात सौरऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत वाचा सविस्तर

Solar Energy : अकोल्यात सौरऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत वाचा सविस्तर

latest news Solar Energy: The light of solar energy in Akola! Solar project at the service of farmers Read in detail | Solar Energy : अकोल्यात सौरऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत वाचा सविस्तर

Solar Energy : अकोल्यात सौरऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत वाचा सविस्तर

Solar Energy : अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी उगवतोय हरित ऊर्जेचा नवा सूर्य. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सुरू झालेले रेडवा, भेंडीमहाल, मनात्री आणि अकोलखेड येथील सौर प्रकल्प शेतकऱ्यांच्या शाश्वत सिंचन स्वप्नांना देणार आहेत उर्जा. (Solar Energy)

Solar Energy : अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी उगवतोय हरित ऊर्जेचा नवा सूर्य. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सुरू झालेले रेडवा, भेंडीमहाल, मनात्री आणि अकोलखेड येथील सौर प्रकल्प शेतकऱ्यांच्या शाश्वत सिंचन स्वप्नांना देणार आहेत उर्जा. (Solar Energy)

शेअर :

Join us
Join usNext

Solar Power : अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी उगवतोय हरित ऊर्जेचा नवा सूर्य. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सुरू झालेले रेडवा, भेंडीमहाल, मनात्री आणि अकोलखेड येथील सौर प्रकल्प शेतकऱ्यांच्या शाश्वत सिंचन स्वप्नांना देणार आहेत उर्जा. (Solar Energy)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' (Mukhya Mantri Saur Krushi Vahini Yojana 2.0) अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील रेडवा (२ मेगावॅट) आणि भेंडीमहाल (१० मेगावॅट) या दोन सौर प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. (Solar Energy)

यासोबतच तेल्हारा तालुक्यातील मनात्री आणि अकोट तालुक्यातील अकोलखेड (प्रत्येकी १० मेगावॅट) या सौर प्रकल्पांचे भूमिपूजनही झाले.(Solar Energy)

या प्रकल्पांमुळे सुमारे ४ हजार शेतकऱ्यांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीज मिळणार असून, त्यामुळे कृषिपंपांची कार्यक्षमता वाढणार आहे. विशेषतः रेडवा, कान्हेरी, धाबा, पातूर महागाव, बहिरखेड अशा अनेक गावांतील शेतकरी थेट लाभार्थी ठरणार आहेत.(Solar Energy)

तसेच, मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे आणि पारद येथील ३३ केव्ही उपकेंद्रांचेही भूमिपूजन याच वेळी पार पडले. यामुळे वीज वितरणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.(Solar Energy)

कार्यक्रमास पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, विविध आमदार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या योजनेमुळे अकोला जिल्हा हरित ऊर्जा निर्मितीत एक पाऊल पुढे गेला आहे.(Solar Energy)

या योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या बार्शी टाकळी तालुक्यात रेडवा सौर प्रकल्पाची क्षमता २ मेगावॅट आणि भेंडीमहाल सौर प्रकल्पातून १० मेगावॅट इतकी हरित ऊर्जा निर्माण होणार आहे. 

या दोन्ही प्रकल्पामुळे बार्शी टाकळी तालुक्यातील दगड पारवा, कान्हेरी, रेडवा, धाबा बार्शीटाकळी, पातूर महागाव, बहिरखेड, घोटा नंदापूर, महान, आदी गावातील २ हजार ५९५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार आहे.

मनात्री, अकोलखेड सौर प्रकल्पाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या तेल्हारा तालुक्यातील मनात्री आणि अकोट तालुक्यातील अकोलखेड या दोन्ही सौर प्रकल्पाची क्षमता प्रत्येकी १० मेगावॅट एवढी असून या प्रकल्पामुळे परिसरातील १५०० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

हिवरा कोरडे, पारद उपकेंद्राचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मूर्तिजापूर तालुक्यातील ३३ केव्ही हिवरा कोरडे आणि ३३ केव्ही पारद, या दोन उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.

हे ही वाचा सविस्तर : Solar Panel : सौरऊर्जेतील क्रांती: अकोल्यात तयार झाला स्वयंचलित स्वच्छता ड्रोन! वाचा सविस्तर

Web Title: latest news Solar Energy: The light of solar energy in Akola! Solar project at the service of farmers Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.