Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शिरपूरचा 'हा' आठवा साखर कारखाना येणार शेतकऱ्यांच्या सेवेत, करारनामा प्रक्रिया पूर्ण 

शिरपूरचा 'हा' आठवा साखर कारखाना येणार शेतकऱ्यांच्या सेवेत, करारनामा प्रक्रिया पूर्ण 

Latest news Shirpur Farmers' Cooperative Sugar Factory will start operations in next sugar season | शिरपूरचा 'हा' आठवा साखर कारखाना येणार शेतकऱ्यांच्या सेवेत, करारनामा प्रक्रिया पूर्ण 

शिरपूरचा 'हा' आठवा साखर कारखाना येणार शेतकऱ्यांच्या सेवेत, करारनामा प्रक्रिया पूर्ण 

Shirpur Sugar factory : २०२६-२७ च्या गळीत हंगामात साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार आहे.

Shirpur Sugar factory : २०२६-२७ च्या गळीत हंगामात साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार आहे.

धुळे : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. (म.प्र.) यांना भाडेतत्वावर देण्यात आला असून येत्या वर्षाच्या हंगामात साखर कारखाना सुरु होणार असून त्या दृष्टीने अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी पाठपुरावा केला आहे.

सदरचा कारखाना २० वर्षे कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्यासाठी मे. माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. मध्यप्रदेश यांना शिरपूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकारी यांनी ताब्यात दिला होता. याबाबत त्यावेळी कायदेशीर नोटरी करून देण्यात आली होती. अधिकृतपणे संपूर्ण रजिस्ट्रेशन होण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. 

या सर्व तांत्रिक अडचणी दूर होऊन ३० जानेवारी रोजी अधिकृतरित्या शासन दरबारी रजिस्ट्रेशन होऊन २०२६-२७ च्या गळीत हंगामात साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार आहे. अधिकृतरित्या संबंधित माँ रेवा कंपनीला नियमाप्रमाणे संपूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून कंपनीसोबत करारनामा पूर्ण करण्यात आला आहे. 

यापूर्वी ७ साखर कारखाने होते सुरू....
पुढील हंगामात कारखाना सुरु होण्याबाबत माँ रेवा कंपनचे जनरल मॅनेजर गणेश यादव यांनी संपूर्ण माहिती दिली. माँ रेवा कंपनीचे डायरेक्टर अंकित गोयल यांनी शिरपूरचा हा ८ वा साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतला असून यापूर्वी ७ साखर कारखाने त्यांनी यशस्वीरित्या चालविले आहेत. 

शेतकऱ्यांमध्ये समाधान...
गेल्या काही वर्षापासून शिरपूर तालुक्यातील ऊस याच अनुभवी उद्योजकांकडे दुर्गा खांडसरी व ठिकरी मध्यप्रदेश येथील साखर कारखान्यांमध्ये शेतकरी बांधव होते. शिरपूर शेतकरी साखर कारखाना हा पुढील वर्षाच्या हंगामात सुरु होणार असल्याने शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व नागरिकांनी समाधान व्यक्त केले  आहे.

Web Title : शिरपुर की आठवीं चीनी मिल जल्द ही किसानों की सेवा में

Web Summary : पट्टे समझौते के बाद शिरपुर चीनी मिल माँ-रेवा शुगर्स के तहत फिर से शुरू होगी। पंजीकरण बाधाएं दूर हुईं, संचालन 2026-27 सीज़न के लिए निर्धारित हैं। अनुभवी समूह द्वारा स्थानीय गन्ना उत्पादकों को लाभ पहुंचाने के उद्देश्य से किसान संतुष्टि व्यक्त करते हैं।

Web Title : Shirpur's Eighth Sugar Factory to Serve Farmers Soon

Web Summary : Shirpur's sugar factory will restart under Maa-Reva Sugars after a lease agreement. Registration hurdles cleared, operations are set for the 2026-27 season. Farmers express satisfaction as the experienced group aims to benefit local sugarcane producers.