Shetkari Madat : अतिवृष्टी आणि हवामानातील अनियमिततेमुळे यंदा यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ६ लाख ५५ हजार ४२ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Shetkari Madat)
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून ५५८ कोटी ९२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी ५ लाख ३० हजार ७३६ शेतकरी लाभार्थी पात्र ठरले.(Shetkari Madat)
परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी पोहोचलेला नाही. आता या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी 'व्हीके नंबर' अनिवार्य करण्यात आला आहे. (Shetkari Madat)
हा नंबर शेतकऱ्यांना गावातील सरपंच किंवा पोलिस पाटलाकडून मिळणार आहे. नंबर देऊन थंब व्हेरिफिकेशन झाल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी जमा होणार आहे. (Shetkari Madat)
ई-केवायसी न झाल्याने निधी अडला
तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८८ टक्के (३६२ कोटी रुपये) निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना खालील कारणांमुळे निधी मिळू शकला नाही.
ई-केवायसी न होणे
बँक खात्यातील चुका
जमिनीचे संयुक्त सातबारा
लाभार्थीमृत्यू झालेल्या प्रकरणांची नोंद
नाव-आधार विसंगती
या सर्व प्रकरणांचे निवारण करून निधी मिळविण्यासाठी शासनाने नवीन यंत्रणा लागू केली आहे.
व्हीके नंबर म्हणजे काय?
निधी न मिळालेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट व्हेरिफिकेशन कोड (VK Number) देण्यात आला आहे.
हा नंबर शेतकऱ्यांनी खालील ठिकाणांहून मिळवू शकतो
* गावाचे सरपंच
* पोलिस पाटील
या दोघांकडे जिल्हा प्रशासनाने व्हीके नंबरची अधिकृत यादी पाठविली आहे.
नंबर मिळाल्यावर काय करावे?
शेतकऱ्यांनी सरपंच/पोलिस पाटलाकडून आपला व्हीके नंबर घ्यावा
जवळच्या सीएससी/सेतू केंद्रावर हा नंबर जमा करावा
केंद्रावर थंब व्हेरिफिकेशन केल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल
त्यानंतर १०–१५ दिवसांत मदतीचा निधी बँक खात्यात जमा होईल
६० हजार लाभार्थ्यांची फाईल प्रलंबित
अद्याप ६० हजार शेतकऱ्यांचे कागदपत्र अद्ययावतीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.
यामध्ये मुख्यत संयुक्त सातबारा प्रकरणे
मृत लाभार्थ्यांचे वारस
नाव–आधार दुरुस्ती
या शेतकऱ्यांना २२२ कोटी रुपयांचा निधी वितरित होणे बाकी आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्या गावातील सरपंच किंवा पोलिस पाटील यांच्याशी त्वरित संपर्क करा. व्हीके नंबर मिळवण्यास विलंब करू नका. ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय मदतीचा निधी मिळणार नाही.
हे ही वाचा सविस्तर :
