Lokmat Agro >शेतशिवार > तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा, आजूबाजूचे गट नंबर, शेतरस्तेही दिसतील 

तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा, आजूबाजूचे गट नंबर, शेतरस्तेही दिसतील 

Latest news Shet Jamin Kharedi necessary to see land map while buying agricultural land | तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा, आजूबाजूचे गट नंबर, शेतरस्तेही दिसतील 

तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा, आजूबाजूचे गट नंबर, शेतरस्तेही दिसतील 

Shet Jamin Map : ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं.

Shet Jamin Map : ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं.

शेअर :

Join us
Join usNext

Shet Jamin Map : ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं. यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्द कळते. नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घ्यावी. दुसरं म्हणजे चतुर्सिमा कळते. 

आपण जी जमीन खरेदी करतोय, त्याच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत, आपल्या शेत जमिनीला शेजार कोण आहे हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. सध्या शेत रस्ता वाद व शेत जमिनीचे बांध कोरून शेजारच्या शेतात अतिक्रमण करणे अशी प्रकरणे वाढली आहेत. त्यामुळे गटाचा नकाशा ही महत्वाची बाब आहे. 

तसेच जमीन खरेदी करताना शासकीय जमीन मोजणी करून घ्यावी. जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल. 

शेत रस्ता
जी जमीन खरेदी करायची आहे, तिथं जाण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही, तो रस्ता पाय वाट आहे का की गाडी वाट आहे. तसेच पांदन आहे की डांबरी रस्ता  ते पाहावं. 

जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो. पण, जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करणे गरजेचे आहे.


- ॲड . वैजनाथ दिपकराव वांजरखेडे 
कायदे विषयक अभ्यासक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार 
पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन प्रमाणित 

Web Title: Latest news Shet Jamin Kharedi necessary to see land map while buying agricultural land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.