Shet Jamin Rasta : शेतासाठी नवीन रस्ता मिळण्याची पहिली तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार तहसीलदार तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता मिळवून देऊ शकतात. तुम्हाला तहसीलदारांकडे तुमच्या शेतीकरीता शेतरस्ता मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी कुठली कागदपत्रे आवश्यक असतात, ते पाहुयात..
नवीन रस्ता हवा असल्यास अर्ज सादर करून खालील कागदपत्रे जोडावीत.
- १. अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ज्या शेतासाठी रस्ता हवा आहे. त्या शेताचे गट नंबर, सव्र्व्हे नंबर आणि हद्दीतील तपशील, रस्ता कोणत्या जागेवरून हवा आहे, त्याची सविस्तर माहिती, अर्जदाराच्या शेतजमिनीचा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्याचा कच्चा नकाशा.
- २. अर्जदाराच्या शेतजमिनीचा भूमी अभिलेखाकडील शासकीय मोजणी नकाशा.
- ३. अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील ७/१२ उतारा.
- ४. रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक लगतच्या सर्व शेतकऱ्यांची संमतीपत्रे व पत्ते.
- ५. अशा जमिनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्याची माहिती कागदपत्रांसह कार्यालयास द्यावी.
- ६. शेतजमिनीशी संबंधित इतर अन्य कागदपत्रे.
उपलब्ध रस्ता मोकळा करण्यासाठी अर्ज सादर करून खालील कागदपत्रे जोडावीत.
- १. दावेदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील (३ महिन्याच्या आतील)
- ७/१२ उतारा व मोजणी नकाशा.
- २. रस्ता मोकळा करणेसाठी आवश्यक लगतच्या सर्व (रस्ता अडवलेल्या) शेतकऱ्यांची नावे व पत्ते
- ३. निर्माण झालेल्या अडथळ्यांचे फोटो, कच्चा नकाशा.
- ४. दाव्यास कारण निर्माण होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही हे सिध्द करणारी काही कागदपत्रे किंवा फोटो.
अशा जमिनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असतील तर न्यायालयाने जर स्थगिती आदेश (Stay Order) किंवा जैसे थे (Status quo) आदेश दिला असेल तर त्याची माहिती कागदपत्रांसह सदर अर्जासोबत सादर करावी.
- ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे, कायदे विषयक लेखक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार पुराभिलेख संचलनालय, महाराष्ट्र शासन प्रमाणित
