Lokmat Agro >शेतशिवार > Sericulture Farming : 'सिल्क अन् मिल्क' संकल्पना शेतकऱ्यांसाठी ठरणार गेमचेंजर! वाचा सविस्तर

Sericulture Farming : 'सिल्क अन् मिल्क' संकल्पना शेतकऱ्यांसाठी ठरणार गेमचेंजर! वाचा सविस्तर

latest news Sericulture Farming: 'Silk and Milk' concept will be a game changer for farmers! Read in detail | Sericulture Farming : 'सिल्क अन् मिल्क' संकल्पना शेतकऱ्यांसाठी ठरणार गेमचेंजर! वाचा सविस्तर

Sericulture Farming : 'सिल्क अन् मिल्क' संकल्पना शेतकऱ्यांसाठी ठरणार गेमचेंजर! वाचा सविस्तर

Sericulture Farming : शेतीत नवनवीन पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 'सिल्क अ‍ॅण्ड मिल्क' (Silk & Milk) ही संकल्पना वरदान ठरत आहे. तुती लागवड आणि दुग्धव्यवसायाचा संगम करून एका बाजूने रेशीम कोष विक्रीतून मासिक उत्पन्न मिळते, तर दुसऱ्या बाजूने दररोज दुधविक्रीतून शाश्वत नफा मिळतो. वाचा सविस्तर (Sericulture Farming )

Sericulture Farming : शेतीत नवनवीन पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 'सिल्क अ‍ॅण्ड मिल्क' (Silk & Milk) ही संकल्पना वरदान ठरत आहे. तुती लागवड आणि दुग्धव्यवसायाचा संगम करून एका बाजूने रेशीम कोष विक्रीतून मासिक उत्पन्न मिळते, तर दुसऱ्या बाजूने दररोज दुधविक्रीतून शाश्वत नफा मिळतो. वाचा सविस्तर (Sericulture Farming )

शेअर :

Join us
Join usNext

Sericulture Farming : शेतीत नवनवीन पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 'सिल्क अ‍ॅण्ड मिल्क' (Silk & Milk) ही संकल्पना वरदान ठरत आहे. तुती लागवड आणि दुग्धव्यवसायाचा संगम करून एका बाजूने रेशीम कोष विक्रीतून मासिक उत्पन्न मिळते, तर दुसऱ्या बाजूने दररोज दुधविक्रीतून शाश्वत नफा मिळतो. (Sericulture Farming )

शेतीत नवनवीन पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 'सिल्क अ‍ॅण्ड मिल्क' (Silk & Milk) ही संकल्पना वरदान ठरत आहे. तुती लागवड आणि दुग्धव्यवसायाचा संगम करून एका बाजूने रेशीम कोष विक्रीतून मासिक उत्पन्न मिळते, तर दुसऱ्या बाजूने दररोज दुधविक्रीतून शाश्वत नफा मिळतो. (Sericulture Farming )

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपल्या शेतीचा चेहरामोहरा बदलला आहे. पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन नवे मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 'सिल्क अन् मिल्क' (Silk & Milk) ही संयुक्त संकल्पना एक आशादायक भविष्य घडवणारी ठरत आहे. (Sericulture Farming )

तुतीच्या झाडांची लागवड करून महिन्याला रेशीम कोषांची विक्री व दुसरीकडे गायींपासून होणारी दुधविक्री. या दुहेरी स्रोतांमधून शेतकऱ्यांना नियमित आणि समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. (Sericulture Farming )

एकरातून रेशीम, गोठ्यातून दुध; दुहेरी कमाईचा मार्ग

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी एका एकरात तुतीची लागवड करून रेशीम कोषांचे उत्पादन सुरू केले आहे. 

या शेतीतून महिन्याला चांगले उत्पन्न मिळते, तर गायींपासून दररोजची दूधविक्री शेतकऱ्यांसाठी स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत ठरते. 

विशेष बाब म्हणजे, तुतीच्या झाडांमधून मिळणाऱ्या काड्या गायींच्या खाद्यात मिसळल्यास सुमारे ३० टक्के खाद्यखर्चात बचत होते आणि दुधाचा दर्जाही सुधारतो, असा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे.

रेशीम शेती; नवे स्वयंपूर्णतेकडे पाऊल

रेशीम शेतीमुळे केवळ उत्पादनच नाही, तर स्वयंरोजगाराची दारे देखील खुली होतात. तुती लागवडीपासून कोष निर्मिती, धागा प्रक्रिया, वस्त्रनिर्मितीपर्यंत रोजगाराच्या अनेक संधी उलगडतात. देशात व राज्यात रेशीम वस्त्रांची मागणी वाढतच असून, दरवर्षी यामध्ये १६-२० टक्के वाढ नोंदवली जाते.

तुती लागवड

हवामान : २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान, ६५-८५टक्के आर्द्रता

जमीन : हलकी ते भारी, निचऱ्याची सुविधा असलेली जमीन (सामू ६.५ ते ७.८) असावी

सिंचन : संरक्षित सिंचन प्रणाली आवश्यक

लागवड कलावधी : जून ते सप्टेंबर

लागवड पद्धत : पट्टा पद्धती, एका एकरात सुमारे ५ हजार ४५० रोपे

खत व्यवस्थापनाची गरज

तुती पानांच्या गुणवत्तेसाठी वेळोवेळी खत व्यवस्थापन गरजेचे आहे. केंद्रीय रेशीम मंडळ, मैसूर यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य वेळी खत दिल्यास कोषांचे उत्पादन अधिक आणि दर्जेदार मिळते.

सवलतीच्या दरात रोपे हवीत? असा करा अर्ज

रेशीम शेती करायची असल्यास जिल्हा रेशीम कार्यालय, बुलढाणा येथे नोंदणी करून सवलतीच्या दरात तुतीची रोपे मिळवता येतील. यामुळे खर्च कमी होऊन उत्पादनावर भर देता येईल.

शाश्वत शेतीसाठी 'सिल्क अन् मिल्क' हा एक प्रभावी पर्याय 

विदर्भातील हवामान तुती लागवडीसाठी योग्य असल्यामुळे बुलढाणा, अकोला, वाशीमसारख्या जिल्ह्यांत रेशीम शेतीस उत्तम संधी उपलब्ध असून, जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत प्रशिक्षण व मार्गदर्शन मोफत दिले जाते.

हे ही वाचा सविस्तर : Sericulture farming : "सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांना फायद्याची; रेशीम उद्योगातून दुहेरी फायदा

Web Title: latest news Sericulture Farming: 'Silk and Milk' concept will be a game changer for farmers! Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.