Lokmat Agro >शेतशिवार > नंबर पाठवा… मदत देतो! अंबादास पवारांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद

नंबर पाठवा… मदत देतो! अंबादास पवारांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद

latest news Send your number… I will help! Responses from across the state to Ambadas Pawar's plight | नंबर पाठवा… मदत देतो! अंबादास पवारांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद

नंबर पाठवा… मदत देतो! अंबादास पवारांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद

लातूरच्या हडोळती येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी पत्नीच्या साथीने स्वतः औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले. या हृदयद्रावक चित्राला अभिनेता सोनू सूदने नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो! म्हणत दिलासा दिला. त्यानंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि पवार कुटुंबाला नव्याने जगण्याची उमेद मिळाली.

लातूरच्या हडोळती येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी पत्नीच्या साथीने स्वतः औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले. या हृदयद्रावक चित्राला अभिनेता सोनू सूदने नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो! म्हणत दिलासा दिला. त्यानंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि पवार कुटुंबाला नव्याने जगण्याची उमेद मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

लातूरच्या हडोळती येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी पत्नीच्या साथीने स्वतः औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले. या हृदयद्रावक चित्राला अभिनेता सोनू सूदने (Actor Sonu Sood) नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो! म्हणत दिलासा दिला.

त्यानंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि पवार कुटुंबाला नव्याने जगण्याची उमेद मिळाली. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले असूनही परिस्थितीपायी स्वतः औताला जुंपून पत्नीच्या साथीने शेती करणाऱ्या अंबादास पवार या अल्पभूधारक शेतकऱ्याला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यांच्या व्यथेला अभिनेता सोनू सूद यांनीही प्रतिसाद दिला असून, 'तुम्ही नंबर पाठवा, आम्ही बैलजोडी पाठवतो,' असे ट्विट करून मदतीची हमी दिली आहे.

'लोकमत' मधील छायाचित्राने हादरवले

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी पत्नी मुक्ताबाई यांच्या साथीने स्वतःला औताला जुंपून मशागत सुरू केल्याचे बोलके छायाचित्र ३० जून रोजी 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झाले. हे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.

विधिमंडळात पडसाद, नेत्यांकडून आश्वासनांचा वर्षाव

अंबादास पवार यांची व्यथा विधानसभेतही मांडली गेली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून सरकारला सवाल केला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने थेट फोन करून माहिती घेतली, तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी अधिकाऱ्यांना पाठवून पवार यांचा फार्मर आयडी तयार करून शेतीसाठी मदतीचा प्रस्ताव देण्याचे आदेश दिले.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पवार कुटुंबियांच्या नावावर असलेले कर्ज शासनाकडून फेडण्याची जबाबदारी घेतली असून, त्यांच्या मुलाला नोकरी व मुलांच्या शिक्षणाची हमी दिली.

सोनू सूदचा संवेदनशील दृष्टीकोन

कोरोना काळापासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या अभिनेते सोनू सूद यांनी या वृत्ताची दखल घेत ट्विटरवरून 'नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो,' असे लिहून मदतीचे आश्वासन दिले. त्यांच्या या ट्विटनंतर पवार यांच्याशी थेट संपर्क साधला गेला.

नावाजलेल्या संस्थांकडूनही मदतीचा वर्षाव

पवार दाम्पत्याला केवळ सरकारकडूनच नव्हे, तर सामाजिक संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे.

नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी विलास चामे यांनी बैलजोडी, मशागत साहित्य व मुलांच्या शिक्षणासाठी मदत जाहीर केली.

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही बैलजोडीसाठी मदतीचा फोन केला.

मुंबईतील निवृत्त कर्नल विलास डांगे यांनी जानवळच्या सरपंचांमार्फत रोख १० हजार रुपये दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही १० हजार रुपयांची मदत केली.

रघु अरिकपुडी ट्रस्टने तब्बल १ लाख रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात पुढे केला.

शेतकऱ्याचा लढा राज्याला भिडला

अपार संकट असूनही पत्नीच्या साथीने शेतीत राबणाऱ्या अंबादास पवार यांचा लढा राज्यभर गाजत आहे. 'मदतीचा ओघ पाहून आम्हाला पुन्हा जगण्याची उमेद आली,' असे पवार सांगितले.

शेतकऱ्यांच्या अडचणीवर केवळ सहानुभूती नव्हे, तर तत्काळ कृतीचीही नितांत गरज आहे, हे या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाले. अंबादास पवार यांच्या मदतीसाठी उचललेली पावले अन्य शेतकऱ्यांसाठीही आशेचा किरण ठरतील.

हे ही वाचा सविस्तर : अंबादास पवार यांच्या संघर्षाला शासनाची साथ; शेतकऱ्याच्या मदतीला मंत्री धावले वाचा सविस्तर

Web Title: latest news Send your number… I will help! Responses from across the state to Ambadas Pawar's plight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.