Seed Production : विदर्भातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि खरीप हंगामात बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यंदा मोठा उपक्रम राबवला आहे.(Seed Production)
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर या वर्षी तब्बल २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ३५ ते ४० हजार क्विंटल बीजोत्पादन करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग तसेच आंबा पिकाच्या बियाण्यांचे बीजोत्पादन समाविष्ट आहे.(Seed Production)
विद्यापीठाच्या हद्दीत एकूण ५ हजार ५९ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून त्यापैकी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बीजोत्पादनासाठी राखून ठेवण्यात आले आहे.(Seed Production)
खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाच्या पिकांचे सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद बीजोत्पादन याठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. १४ हजार क्विंटल सोयाबीनचे बीजोत्पादन पूर्ण झाले असून तूर पिके फुलोऱ्यावर असल्याने त्याचे उत्पादनही लवकरच बाजारात येणार आहे.(Seed Production)
कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदल, अचानक पावसाची दुष्काळासारखी स्थिती अशा आव्हानांमध्येही यंदा बीजोत्पादन चांगल्या प्रमाणात झाले आहे.(Seed Production)
या प्रक्रियेतील सर्व बियाण्यांचे प्रमाणीकरण विद्यापीठामार्फतच केले जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात सुधारीत आणि गुणवत्तापूर्ण बियाणे जाणार आहेत. या प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.(Seed Production)
विदर्भातील शेतकरी नेहमीच बीजोत्पादनातील अस्थिरता आणि महागाईचा सामना करतात. अशा परिस्थितीत विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना उपलब्धता, गुणवत्ता आणि परवडणारी किंमत यांचा लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.(Seed Production)
खरीप २०२५ साठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रमाणित बियाण्यामुळे उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन करण्यात घेण्यात येत आहे. त्यापासून जवळपास ३५ ते ४० हजार क्विंटल बीजोत्पादन होणार असल्याचे अपेक्षित आहे. बीजोत्पादनातून तयार होणाऱ्या बियाण्यांचे प्रमाणीकरण विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे.- डॉ. एस. एस. माने, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
हे ही वाचा सविस्तर :Tur Production : राज्यात वाढणार तुरीचे उत्पादन; जाणून घ्या काय आहे कारण
