जळगाव : इराण-इस्रायल युद्धामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईची भीती व्यक्त होत आहे. अशात ग्रामीण भागात 'बायोगॅस' हा प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, किती अनुदान मिळते, हे पाहुयात..
अर्ज कसा करावा?
इच्छुक लाभार्थ्यांनी सातबारा उतारा, पशुपालनाचे प्रमाणपत्र, बैंक पासबूक, आधार कार्ड आणि जात प्रमाणपत्रासह आपले अर्ज संबंधित पंचायत समितीमध्ये सादर करावेत.
भविष्यातील गॅस टंचाईची झळ सोसण्यापेक्षा, बायोगॅसचा वापर करून ग्रामीण जनतेने स्वावलंबी बनावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी या पर्यायाचा विचार केला, तर एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व कमी होऊ शकते, असे मत जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी व्यक्त केले.
असे मिळणार अनुदान
सर्वसाधारण प्रवर्ग : २ ते ४ घनमीटर क्षमतेच्या संयंत्रासाठी १४ हजार ३५० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
अनुसूचित जाती-जमाती : २२ हजार रुपयांपर्यंत अनुदान.
विशेष लाभ : बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त १ हजार ६०० रुपयांचे अनुदान दिले जाते.
