Join us

Sagwan Farming: वनसंपदा आता शिवारात: शेतकरी घेतायत सागवान लागवडीचा फायदा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:08 IST

Sagwan Farming : पूर्वी जंगलात मुबलक प्रमाणात आढळणारा सागवान वृक्ष आज दुर्मीळ होत चालला आहे. त्याच्या लाकडाला असणाऱ्या प्रचंड मागणीमुळे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तोड करण्यात आली त्यामुळे आता सागवान नामशेष होण्याच्या मार्गावर आला. त्यामुळे हीच वनसंपदा आता शिवारात आली आहे. (Sagwan Farming)

Sagwan Farming : पूर्वी जंगलात मुबलक प्रमाणात आढळणारा सागवान वृक्ष आज दुर्मीळ होत चालला आहे. त्याच्या लाकडाला असणाऱ्या प्रचंड मागणीमुळे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तोड करण्यात आली त्यामुळे आता सागवान नामशेष होण्याच्या मार्गावर आला.(Sagwan Farming)

मात्र, त्याच झाडाची लागवड शेतकरी आता स्वतः करत असल्याने आता वनसंपदा शिवारात आली आहे.(Sagwan Farming)

कन्नड तालुक्यातील पळशी बु. शिवारातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन सागवान वृक्ष लागवडीकडे वाटचाल सुरू केली आहे. मौल्यवान लाकडासाठी प्रसिद्ध असलेल्या या वृक्षांचे फायदे लक्षात घेत शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी लागवड केली असून आता त्यांची झाडे उत्पादनासाठी तयार झाली आहेत.(Sagwan Farming)

आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने हा एक सकारात्मक बदल असून पर्यावरणपूरक उपक्रमही ठरत आहे. पळशी बु. येथील तातेराव जाधव, मच्छिंद्र जाधव, अतुल गायकवाड, तुकाराम जाधव यांसारख्या शेतकऱ्यांनी बांधावर सागवान लागवड केली आहे.(Sagwan Farming)

शेतकऱ्यांचा मौल्यवान लाकडासाठी प्रसिद्ध असलेल्या सागवान वृक्ष लागवडीकडे कल वाढला आहे. काहींनी शंभर, तर काहींनी हजार झाडे लावली असून, त्यासाठी टिश्यू कल्चर पद्धतीची रोपे वापरली गेली. ही रोपे साधारणतः ११७ रुपये प्रति रोप या दराने उपलब्ध होत आहेत.(Sagwan Farming)

या गावातील काही शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी लावलेले सागवान वृक्ष चांगले बहरले असून, लवकरच त्यांना याद्वारे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. या वृक्षांची तलाठी कार्यालयात सातबारा नोंद घेतली जाते. त्यामुळे वृक्षतोडीसाठी त्रास होत नाही. मात्र, शेतकऱ्यांना वन विभागाची परवानगी घ्यावी लागते, परंतु सातबारा नोंदीमुळे ही परवानगीही लवकरच मिळते.(Sagwan Farming)

पळशी बु. येथील तातेराव जाधव यांनी शेताच्या बांधावर ५० वृक्षांची लागवड पाच वर्षांपूर्वी केली आहे. तर, मच्छिंद्र जाधव यांनी बांधावरच १०० झाडे लावली आहेत. अतुल गायकवाड यांनी देखील लागवड केली आहे. तुकाराम जाधव यांनी बंधाऱ्यावर, तसेच चिकूच्या बागेत तीन एकर क्षेत्रावर एक हजार वृक्ष लावलेले आहेत.

या झाडांना पाच वर्षे पाणी द्यावे लागते. त्यानंतर पाणी नसले, तरी ते वाढत राहतात. भारी जमिनी ऐवजी हलक्या प्रतिच्या जमिनीवर लावले, तर ते जास्त फायदेशीर ठरते.

अशी करा लागवड

* २x२ फूटाचे खड्डे करावे

* रोपांची पाच फुट अंतराने लागवड करावी

* सुरुवातीची ५ वर्षे नियमित पाणी

* ठिबक सिंचनासाठी ३० हजार रुपये खर्च

* खड्डे खोदण्यासाठी ४ हजार रुपये खर्च

* उत्पादनासाठी १०-१५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागते

परवानगी व शासकीय प्रक्रिया

* सागवान वृक्षांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेता येते. त्यामुळे वृक्षतोडीसाठी परवानगी घेणे सोपे जाते. मात्र, वनविभागाची औपचारिक परवानगी घेणे आवश्यक आहे.

* पळशी बु. येथील शेतकऱ्यांनी सागवान लागवडीद्वारे आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या एक आदर्श पायंडा पाडला आहे. या झाडांना काळाची आवश्यकता असून शेतीसोबत हा टिकाऊ आणि नफा देणारा पर्याय ठरू शकतो. जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही अशा प्रकारच्या पर्यायी शेतीतून प्रेरणा घेणे आवश्यक आहे.

शेतकरी सांगतात

माझ्या झाडांचे संगोपन चांगले झाले आहे. झाड जाडीने चांगले वाढल्यास एक झाड १० हजार रुपये देईल, अशी अपेक्षा आहे. काही झाडांची किंमत थोडी कमीही राहू शकते, पण तरीही हा खर्च वसूल होईल. - तातेराव जाधव

मी शेतात १०० झाडे लावली आहेत. लागवडीनंतर पहिल्या काही वर्षांत झाडांना जास्त लक्ष द्यावे लागते. पण आता त्या झाडांची वाढ पाहून समाधान वाटते. - मच्छिंद्र जाधव

सागवान वृक्षांच्या ३०० कलमा चार वर्षापूर्वी लावल्या. यासाठी त्यांना ४५ हजार रुपये खर्च आला. यातून मला दहा ते बारा वर्षानंतर सुमारे १२ लाख रुपये मिळतील. ज्या कंपनीने कलमा बांधावर आणून दिल्या, तेच परत लाकूड विकत घेणार आहेत.- हरिभाऊ थोटे

हे ही वाचा सविस्तर : Chia Seeds: चिया बियांचे असे आहेत चमत्कारी फायदे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेतीवनविभागजंगल