Reshim Kosh Market : एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत राज्यातील रेशीम शेती व त्यावर आधारीत पुरक उद्योगाचा सर्वकष विकास व्हावा तसेच, पूर्व विदर्भातील टसर रेशीम शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या रेशीम कोषास योग्य दर मिळावा म्हणून शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ व अनुषंगीक सोईसुविधा उभारण्यासाठी येणाऱ्या ३ कोटी ८८ लाख ०८ हजार इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
१) काम सुरु करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा तसेच, विस्तृत नकाशा यास वास्तुविशारदांकडून मंजुरी घेऊनच काम सुरु करावे.
२) ढोबळ स्वरुपात धरण्यात आलेल्या तरतूदींबाबत काम करतेवेळी त्याचे सविस्तर विस्तृत अंदाजपत्रक तयार करुनच काम हाती घ्यावे.
४) प्रकल्पस्थळी बांधकाम सुरु करण्यापुर्वी स्थानिक संस्थाकडून आवश्यक त्या वैधानिक परवानग्या घेण्यात याव्यात.
५) नियोजित जागा उपभोक्ता विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन सदर कामाच्या निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात याव्यात.
७) स्थापत्य कामाच्या कालावधीतच विद्युतीकरणाबाबतचे तसेच, इतर अनुषंगीक कामाचे योग्य नियोजन करुन सदर कामे पूर्ण करावीत.
८) इमारतीमध्ये दिव्यांगाकरिता उपलब्ध करुन द्यावयाच्या विशेष सोयीबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
९) विषयांकित कामाकरिता सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही यादृष्टीने विशेष दक्षता घेऊन काम करण्यात यावे.
१०) फर्निचरच्या बाबी तसेच, मांडणीबाबत उपभोक्ता विभागाच्या वतीने संचालक (रेशीम) यांची मान्यता घेतल्यानंतरच निविदा कार्यवाही करावी.
११) टसर रेशीम कोष बाजारपेठ व अनुषंगिक सोई सुविधांच्या उभारणीनंतर व्यवस्थापन व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चाची तरतूद योग्य त्या योजनेखाली करण्याची जबाबदारी संचालक (रेशीम) यांची राहील.
१२) सदर बाजारपेठ उभारणीबाबतची निविदा प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करुन अंतिम मान्यतेसाठी शासनास सादर करावे.
१३) केंद्रीय रेशीम मंडळ, बंगळूरु यांच्या अंतर्गत टसर रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था व राज्य शासनाच्या टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणी संदर्भातील मार्गदर्शक सुचनेनुसार संचालक (रेशीम) यांनी कार्यवाही करावी.
१४) या कामकाजाकरिता उपलब्ध करुन दिलेल्या निधीचा विनियोग त्याच कामासाठी करण्याची तसेच, निधीचे विनियोग प्रमाणपत्र शासनास सादर करण्याची दक्षता संचालक (रेशीम) यांनी घ्यावी.
१५) टसर रेशीम कोष बाजारपेठ व अनुषंगीक कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी संचालक (रेशीम) यांची राहील.
