Lokmat Agro >शेतशिवार > Reshim Farming Scheme : मनरेगा योजनेतून तुती शेती व रेशीम संगोपनास चालना वाचा सविस्तर

Reshim Farming Scheme : मनरेगा योजनेतून तुती शेती व रेशीम संगोपनास चालना वाचा सविस्तर

latest news Reshim Farming Scheme: Mulberry farming and sericulture promoted through MGNREGA scheme Read in detail | Reshim Farming Scheme : मनरेगा योजनेतून तुती शेती व रेशीम संगोपनास चालना वाचा सविस्तर

Reshim Farming Scheme : मनरेगा योजनेतून तुती शेती व रेशीम संगोपनास चालना वाचा सविस्तर

Reshim Farming Scheme : बुलढाण्यात रेशीम उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने 'रेशीम विभाग आपल्या दारी' या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. (Reshim Farming Scheme)

Reshim Farming Scheme : बुलढाण्यात रेशीम उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने 'रेशीम विभाग आपल्या दारी' या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. (Reshim Farming Scheme)

शेअर :

Join us
Join usNext

Reshim Farming : बुलढाणा जिल्हा रेशीम कार्यालयाने 'रेशीम विभाग आपल्या दारी' या विशेष मोहिमेची सुरुवात केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) ही योजना राबविण्यात येत आहे. (Reshim Farming Scheme)

तुती लागवड आणि रेशीम किटक संगोपनासाठी शेतकऱ्यांना तीन वर्षांत तब्बल २ लाख १२ हजार ७८४ मजुरी मिळणार आहेत. (Reshim Farming Scheme)

या उपक्रमाचा उद्देश रेशीम उद्योग सक्षम करणे, पर्यायी शेतीला चालना देणे आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे हा आहे.  (Reshim Farming Scheme)

तीन वर्षांत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ

रेशीम किटक संगोपन गृह बांधकामासाठी : ६६  हजार ४५६ रुपये 

संगोपन साहित्य : १ लाख ५३ हजार 

तुती वृक्ष लागवडीसाठी : ४५ हजार रुपये (१ एकरासाठी)

सिंचन व्यवस्थेसाठी : ४५ हजार रुपये

संगोपन गृह बांधकाम : २ लाख ४३ हजार ७५० रुपये

निर्जंतुकीकरण औषध : ३ हजार ७५० रुपये

या सर्व मदतीचा एकूण लाभ ४ लाख ३२ हजार २४० रुपये इतका असून, सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित होईल.

नोंदणी आणि अटी

मागील दोन वर्षांत नोंदणी केलेल्या परंतु लागवड न केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी दिली जात आहे.

प्रत्येक गावातून किमान ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने अर्ज सादर करणे आवश्यक.

प्रति एकर ५०० रुपये नोंदणी शुल्क भरून अर्ज सादर करावा.

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन योजनेची माहितीपत्रके देण्यात येणार आहेत आणि त्यांच्या अभिप्रायाची नोंद होईल.

पर्यावरण संरक्षण आणि उद्दिष्टे

मुख्यमंत्र्यांच्या १० कोटी वृक्ष लागवड अभियानात या तुती लागवडीचा समावेश करण्यात आला आहे.

रेशीम संचालनालयाला ४ कोटी वृक्ष लागवडीचा लक्ष्य आहे.

त्यापैकी २० लाख (३५० एकर) तुती लागवडीचे उद्दिष्ट बुलढाणा जिल्ह्यासाठी निश्चित केले आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पर्यायी शेती म्हणून तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीत सहभागी व्हावे आणि रेशीम उद्योगाला चालना द्यावी.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : रानभाजीची क्रांती: सुमनबाईंच्या 'कर्टुले' लागवडीने दिला शेतकऱ्यांना नवा मार्ग वाचा सविस्तर

Web Title: latest news Reshim Farming Scheme: Mulberry farming and sericulture promoted through MGNREGA scheme Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.