Lokmat Agro >शेतशिवार > रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक, तर नाशिकच्या द्राक्षांना विशेष उल्लेख पुरस्कार

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक, तर नाशिकच्या द्राक्षांना विशेष उल्लेख पुरस्कार

Latest News Ratnagiri's Hapus mango wins gold medal, Nashik's grapes win special mention award | रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक, तर नाशिकच्या द्राक्षांना विशेष उल्लेख पुरस्कार

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक, तर नाशिकच्या द्राक्षांना विशेष उल्लेख पुरस्कार

Agriculture News : एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.

Agriculture News : एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवी दिल्ली : नाशिकने आपल्या द्राक्षे आणि मनुकांसाठी (ग्रेप्स अँड रेझिन्स) कृषी क्षेत्रातील श्रेणी अ अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला. नाशिकच्या द्राक्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे, आणि या यशाने नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला मान्यता मिळाली. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला.

एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत  महाराष्ट्राने चमकदार कामगिरी  केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील आपल्या विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.

महाराष्ट्राची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमात सुवर्ण कामगिरी
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा ठसा उमटवणे आहे.

या उपक्रमांतर्गत 2024 च्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने आपली उत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणीत पुरस्कार मिळविले. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यानेही सुवर्णपदक मिळवले आहे. 

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक
जागतिक स्तरावर ‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला आहे. कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे. हापूस आंब्याची गोड चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले आहे. 

नागपूरी संत्र्यांना रौप्यपदक
नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले असून नागपूर संत्र्यांनी आपल्या रसाळ चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे. 

गैर-कृषी क्षेत्रातील यश
अकोला जिल्ह्याने गैर-कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ब अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे.  कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जिल्हा उद्योग केंद्र, अकोल्याचे महाव्यवस्थापक  संतोष बनसोड यांनी स्वीकारला.

Web Title: Latest News Ratnagiri's Hapus mango wins gold medal, Nashik's grapes win special mention award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.