New Ration Card : आजकाल आधार कार्डसारखेच अनेकजण रेशनकार्ड (Ration Card) स्वतःजवळ ठेवत असतात. रेशनकार्ड अनेक कामासाठी उपयुक्त असते. आता नवीन रेशन कार्ड, नावे वगळायची / समाविष्ट करायची, रेशनबाबत कोणतीही तक्रार करायची सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्हालाही नवीन रेशन कार्ड (New Ration card) काढायचे असल्यास ते ऑनलाईन काढू शकतात, ते कसे पाहुयात...
नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा:
1. आवश्यक कागदपत्रे -
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इ.)
- पत्त्याचा पुरावा (वीज बिल, भाड्याचा करार, आधार कार्ड इ.)
- उत्पन्नाचा दाखला
- कुटुंबातील सदस्यांचे फोटो
- इतर आवश्यक कागदपत्रे (जसे की, रेशन कार्ड असल्यास, ते रद्द केल्याचा दाखला)
2. अर्ज भरून सबमिट करणे -
- सर्वप्रथम अन्न पुरवठा विभागाच्या https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx अधिकृत वेबसाईटवर जा.
- तिथे साईन इन किंवा रजिस्टर पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर Public Login या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर New User Sign Up Here वर क्लिक करा
- नवीन रेशन कार्डसाठी 'Want to apply for New Ration Card' वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व माहिती अचूक भरा. त्यानंतर तुमचा युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
- त्यानंतर Register User वर क्लिक करून आपले युजर आयडी व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा.
- त्यानंतर कॅप्चा निट भरा आणि Get OTP या ऑप्शनवर क्लिक करा.
- ओटीपी टाकल्यानंतर Submit ऑप्शनवर क्लिक करा.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमचे अकाउंट उघडेल.
- अकाऊंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इनवर जाऊन रजिस्टर्ड युजर या ऑप्शनवर क्लिक करा.
- पुन्हा लॉग इन, पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- आता अॅप्लिकेशन रिक्वेस्टमध्ये 'Apply For New Ration card' वर क्लिक करा आणि तिथे मागितलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
- त्यानंतर Submit For Payment वर क्लिक करून शुल्क भरा.
- ऑनलाइन फी जमा केल्यावर तुमची माहिती पडताळणीसाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे जाईल. यानंतर तुमचे रेशन कार्ड मिळेल.
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात संपर्क साधावा..