नाशिक : राज्य शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना (Rabbi Pik Vima) सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा संरक्षण मिळाले आहे. १ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा पिकासाठी नाशिक जिल्ह्यातील (Nashik Farmer) दोन लाख ७९ हजार २०० शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असून, जवळपास एक लाख ८८ हजार २२९ हेक्टर पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे.
शासन तसेच कृषी विभागाच्या (Agriculture Department) आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी पीकविमा काढला आहे. शेतकऱ्यांना १ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत गहू, कांदा, हरभरा पिकासाठी शेतकऱ्यांनी रब्बीचा पीकविमा उतरविला आहे तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत पिकांचा पीकविमा भरता येणार आहे.
खरीप हंगाम २०२३ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नाशिक जिल्ह्यात तसेच येवला तालुक्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान भरपाई रक्कम मिळाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामात २०२४ मध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक योजनेत सहभाग नोंदविला आहे.
- शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला
७५ टक्के जोखीमस्तर
सर्व अधिसूचित पिकांसाठी ७५ टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार रब्बीत देखील शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे. पीकविमा योजना अधिसूचित पिकांसाठी लागू राहणार आहे. रब्बी गहू, बागायती, हरभरा, कांदा तसेच उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत.
रब्बीचा पीकविमा आकडेवारी
पंतप्रधान पिक विमा योजना रब्बी हंगाम नाशिक जिल्ह्यातील सदस्यत पाहिले असता बागलाण तालुक्यातून 30 हजार 20 शेतकरी, चांदवड तालुक्यातून 25 हजार 518 शेतकरी, देवळा तालुक्यातील 2088 शेतकरी, दिंडोरी तालुक्यातून 04 हजार 164 शेतकरी, इगतपुरी तालुक्यातून 2591 शेतकरी, कळवण तालुक्यातून 1329 शेतकरी, मालेगाव तालुक्यातून 37 हजार 218 शेतकरी, नांदगाव तालुक्यातील 31 हजार 878 शेतकरी, नाशिक तालुक्यातून 4582 शेतकरी, निफाड तालुक्यातून 21 हजार 11 शेतकरी, सिन्नर तालुक्यातून 50 हजार 25 शेतकरी सुरगाणा तालुक्यातून 300 शेतकरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून 374 शेतकरी, तर येवला तालुक्यातून 50 हजार 102 शेतकरी असे एकूण 02 लाख 79 हजार 200 शेतकऱ्यांनी रब्बीचा पिक विमा काढला आहे. तर जवळपास एक लाख 88 हजार 229.81 हेक्टर वरील पिक विमा काढण्यात आला आहे.
Crop Management : अन्नद्रव्यांची कमतरता, पिकावरील लक्षणे आणि उपाय, जाणून घ्या सविस्तर