Rabbi Season 2025 : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने रब्बी पिकांच्या पेरणी (Rabbi Season) क्षेत्राची प्रगती 14 जानेवारी 2025 रोजी जारी केली. यंदाच्या रब्बी हंगामात (Rabbi Sowing) 632 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असून 320 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत गहू पेरणीचे (wheat Sowing) क्षेत्र 315.63 लाख हेक्टर इतके होते.139.81 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची पेरणी झाली, तर 53.55 हेक्टर क्षेत्रावर श्री-अन्न आणि भरड धान्याची पेरणी झाली. कृषी आणि कृषक कल्याण विभागाने 14 जानेवारी 2025 रोजी रब्बी पिकांखालील क्षेत्राची सद्यःस्थिती जाहीर केली आहे.
यामध्ये गव्हाची पेरणी आतापर्यंत 320 लाख हेक्टरवर झाली असून मागील वर्षी 315 लाख हेक्टर झाली होती. अनुक्रमे हरभरा यंदा 96.65 लाख हेक्टरवर तर मागील वर्षी 95.87 लाख हेक्टरवर, तर कडधान्य यंदा 139 लाख हेक्टरवर, तर मागील वर्षी देखील 139 लाख हेक्टरवर, तर मसुरीची पेरणी यंदा 17.43 लाख हेक्टरवर तर मागील वर्षी 17.76 लाख हेक्टर वर झाली होती.
ज्वारी, बाजरीची पेरणी
तर यंदा ज्वारीची पेरणी 23.58 लाख हेक्टरवर तर बाजाराची पेरणी 0.13 लाख हेक्टरवर नाचणीची पेरणी 0.69 लाख हेक्टरवर तर मक्याची पेरणी 22.37 लाख हेक्टरवर करण्यात आले आहे तसेच भुईमुगाची पेरणी यंदा 3.65 लाख हेक्टरवर तर करडईची पेरणी 0.70 लाख हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी 0.74 लाख हेक्टरवर तर सिसम ची पेरणी 0.20 लाख हेक्टरवर आणि जवसाची पेरणी 2.68 लाख हेक्टरवर करण्यात आले आहे.
वाटाणा, मुगाची पेरणी
तसेच यंदाच्या वर्षी वाटाण्याची पेरणी 94 लाख हेक्टरवर तर मागील वर्षी 8.98 लाख हेक्टरवर तसेच कुळीद यावर्षी 3.13 लाख हेक्टरवर, तर काळ्या उडदाची पेरणी आतापर्यंत 4.95 लाख हेक्टरवर, तसेच मुगाची पेरणी यंदा 1.14 लाख हेक्टरवर तर मागील वर्षी 0.99 लाख हेक्टर वर करण्यात आली होती. अशा पद्धतीने यंदा रब्बी हंगामात 632 लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असून मागील वर्षी हा आकडा 631 लाख हेक्टर इतका होता.