Rabbi Pik Vima : प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना- रब्बी हंगाम २०२३-२४ करिता ३ कोटी ९९ लाख ३७ हजार ९ इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरीत करण्यासाठी, मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना रब्बी पीक विम्याचा हफ्ता मिळणार आहे.
रब्बी हंगाम २०२३ मधील पिक विमा हप्ता करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यानुसार सहा विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत. यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत २५ हजार ५३७ शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असून यामध्ये ०२ कोटी ५५ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम देय आहे. तर चोलामंडलम एम एस या कंपनी अंतर्गत १२९५ शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असून यामध्ये ०१ कोटी २९ लाख ५ हजार रुपयांची रक्कम देय आहे.
तसेच तसेच एचडीएफसी इरगो कंपनी अंतर्गत १९ हजार ८३२ शेतकरी पात्र असून या कंपनीकडून ०१ कोटी ९८ लाख ३२ हजार रुपयांची देय आहे. तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीतर्गत ८२ शेतकरी पात्र असून या कंपनीकडून ८२ हजार रुपयांची देय आहे. तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत २४ हजार ४५८ शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना ०२ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम देय आहे.
रिलायन्स कंपनी अंतर्गत ४६८७ शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना ४६ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम देय आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत १४ हजार ३०६ शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना १४ कोटी ३० लाख ६ हजार रुपयांची रक्कम देय आहे. त्यानंतर युनायटेड इंडिया कंपनी अंतर्गत ८१९ शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना ०८ लाख १९ हजार रुपयांची देय आहे. तर युनिव्हर्सल सोंपोज या कंपनी अंतर्गत ३१० शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असून या शेतकऱ्यांना ०३ लाख १० हजार रुपयांची रक्कम देय आहे.
दरम्यान विमा कंपनीकडून देय निश्चित नुकसान भरपाई रक्कम त्याचबरोबर राज्य शासनाकडून देय तफावत रक्कमभार तसेच २८ मार्च २०२५ च्या शासन निर्णयावर निर्णयान्वये वितरित राज्य शासन शासन देय तफावत रक्कमभार आणि राज्य शासनाकडून वितरित करा आवश्यक तफावत रक्कम अशी एकूण ०३ कोटी ९९ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.