Jaivik Sheti Mission : हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीच्या (Natural Farming Mission) माध्यमातून विषमुक्त शेतीचा प्रयोग सर्वत्र राबविला जात आहे. जवळपास ५० हेक्टर क्षेत्रावर कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.
रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना राबवली जात आहे. या योजनेच्या धर्तीवर कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक (Dr Panjabrao Deshmukh Jaivik Sheti Mission) कृषी अभियानांतर्गत ५० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर कळमनुरी तालुक्यातील नैसर्गिक शेतीची आवड असणाऱ्या गावातील सरपंचांनी कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होऊ शकणाऱ्या ५० शेतकऱ्यांची (मोबाईल क्रमांकासह) ग्रामपंचायतीचा ठराव व यादी सादर करावी. नैसर्गिक शेतीची क्षमता पाहून त्यांच्या गावाची निवड केली जाईल. तसेच यादीत प्रथम येणाऱ्या गावांना प्राधान्य दिले जाईल. मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे यादी निश्चित करून प्रसिद्ध केली जाईल..
यांच्याशी संपर्क साधावा
या महिन्यापासून नैसर्गिक शेतीच्या चळवळीला सुरुवात होणार आहे. या मिशनचा उद्देश शाश्वत कृषि उत्पादनासाठी नैसर्गिक/सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आहे. या दरम्यान निवडलेल्या परिसरात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर थांबवुन जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यास प्रोत्साहन देणे. तसेच सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे, हा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या ९७६५३९०९७६ आणि ७५८८१५३१९३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mahadbt Drone Anudan Yojana : शेतकऱ्यांनो ड्रोनसाठी अर्ज करा; ४ लाख अनुदान मिळवा! वाचा सविस्तर