Lokmat Agro >शेतशिवार > Gharkul Yojana Anudan : पीएम घरकुल योजना अनुदानात 'इतक्या' रुपयांची वाढ होणार,  वाचा सविस्तर 

Gharkul Yojana Anudan : पीएम घरकुल योजना अनुदानात 'इतक्या' रुपयांची वाढ होणार,  वाचा सविस्तर 

Latest News Pm Awas Yojana Gharkul Yojana subsidy will be increased by 50 thousand rupees, read in detail | Gharkul Yojana Anudan : पीएम घरकुल योजना अनुदानात 'इतक्या' रुपयांची वाढ होणार,  वाचा सविस्तर 

Gharkul Yojana Anudan : पीएम घरकुल योजना अनुदानात 'इतक्या' रुपयांची वाढ होणार,  वाचा सविस्तर 

PM Awas Yojana : या अनुदानामध्ये घरकुलाची (Gharkul Awas Yojana) काम पूर्ण करणं हे शक्य होत नसल्यामुळे बरेच घरकुलाची काम रखडले जातात.

PM Awas Yojana : या अनुदानामध्ये घरकुलाची (Gharkul Awas Yojana) काम पूर्ण करणं हे शक्य होत नसल्यामुळे बरेच घरकुलाची काम रखडले जातात.

शेअर :

Join us
Join usNext

PM Gharkul Yojana : पंतप्रधान ग्रामीण आवास योजना (PM Awas Yojana) या योजनेत साधारण ०१ लाख २० हजार रुपयांचा निधी देण्यात येतो, मागील सात वर्षात या निधीत वाढ झाली नसल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे. त्या अनुषंगाने या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे यापूर्वी मिळणाऱ्या अनुदानात (Gharkul Yojana Anudan) वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

प्रधानमंत्री आवास योजनेचा महाराष्ट्राला (Gharkul Yojana Installment) वीस लाख घरांचा उद्दिष्ट मिळाले आहे. देशातल्या आजपर्यंतच्या योजनेपैकी सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. मागील ४५ दिवसात १०० टक्के घरांना मान्यता देण्यात यश आले आहे आणि जवळजवळ दहा लाख ३४ हजार घरांना पहिला हप्ता देखील वितरित करण्यात आल्याचे आहे. उर्वरित दहा लाख घरांना देखील येत्या काही दिवसात पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. ही प्रक्रिया असली तरी हे त्या वर्षभरातच २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचे लक्ष असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या माध्यमातून घरकुलासाठी दिलं जाणरे अनुदानाबाबत वेळोवेळी नाराजी जाहीर केले जाते. याच पार्श्वभूमीवर वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. राज्यामध्ये २० लाख नवीन घरकुलाला मंजुरी देण्यात आली असून घरकुलाचा पहिला हफ्ता वितरण करण्यात आला आहे. परंतु हे सर्व होत असताना घरकुलाचं जे अनुदान आहे, या अनुदानामध्ये घरकुलाची काम पूर्ण करणं हे शक्य होत नसल्यामुळे बरेच घरकुलाची काम रखडले जातात. हे वेळेत पूर्ण होत नाहीत, परिणामी उद्दिष्ट पूर्ण होत नाही. या अनुषंगाने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

आगामी अर्थसंकल्पात तरतूद

आगामी अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असून तशी घोषणा देखील केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नाही. अशा लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांच्या ऐवजी एक लाख रुपयांचे अनुदान करण्यात आलेले आहे. तर शबरी आवास योजनेचे अंतर्गत अडीच लाखापर्यंत अनुदान देण्यात येते. याच पार्श्वभूमी राहता प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत दोन लाख दहा हजारापर्यंत अनुदान देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. 

Web Title: Latest News Pm Awas Yojana Gharkul Yojana subsidy will be increased by 50 thousand rupees, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.