Lokmat Agro >शेतशिवार > Pik Vima Vitaran : 'या' जिल्ह्यांतही पीक विमा वितरणास सुरवात, तर अनेकांच्या पॉलिसी रद्द, वाचा सविस्तर 

Pik Vima Vitaran : 'या' जिल्ह्यांतही पीक विमा वितरणास सुरवात, तर अनेकांच्या पॉलिसी रद्द, वाचा सविस्तर 

Latest News Pik Vima Yojana Crop insurance distribution has started in hingoli nanded districts too, read in details | Pik Vima Vitaran : 'या' जिल्ह्यांतही पीक विमा वितरणास सुरवात, तर अनेकांच्या पॉलिसी रद्द, वाचा सविस्तर 

Pik Vima Vitaran : 'या' जिल्ह्यांतही पीक विमा वितरणास सुरवात, तर अनेकांच्या पॉलिसी रद्द, वाचा सविस्तर 

Pik Vima Vitaran : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पिक विमा (Pik Vima Scheme) खात्यावर येण्याची वाट पाहत होते.

Pik Vima Vitaran : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पिक विमा (Pik Vima Scheme) खात्यावर येण्याची वाट पाहत होते.

शेअर :

Join us
Join usNext

Pik Vima Vitaran : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पिक विमा (Pik Vima Scheme) खात्यावर येण्याची वाट पाहत होते. अखेर काही जिल्ह्यात पिक विमा वाटपास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरु आहे.

यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली, नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे. यात हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रीम पीक विमा अर्थात पीक विमा (Crop Insurance) यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे.

याचबरोबर बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव या जिल्ह्यातही पिक विमा वितरण (Pik Vima Vitaran) सुरू झाले आहे. यात धाराशिव जिल्ह्यात ०६ हजार २०६ रुपये प्रति हेक्टर प्रमाणामध्ये हे वितरण सुरू आहे. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पिक विम्याची कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशन झालेले होतं अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पिक विम्याचे वितरण सुरू आहे. यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सद्यस्थितीत कॅल्क्युलेशन अवेटेड असल्याचे दाखवीत आहे.

बोगस पॉलिसी प्रकरण
तसेच नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी देखील प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांचे देखील कॅल्क्युलेशन ची प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर आणि परभणी मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहेत. यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरण शिवाय क्षेत्र जास्त दाखवणे, पीक पाण्याला क्षेत्र नसणे, शिवाय महत्त्वाचं कारण म्हणजे पोट खराबाच्या क्षेत्रावर पिक विमा भरणे. समजा एक गुंठा पोट खराबाच्या क्षेत्रावर पिक विमा भरलेला असेल तरीसुद्धा ती पॉलिसी सरसकट बाद केली जात आहे. 

या जिल्ह्यात कॅल्क्युलेशनची प्रक्रिया 
दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरात लवकर पिक विमा वाटपास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूरसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीकविमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन अद्याप अवेटेड दाखवत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: Latest News Pik Vima Yojana Crop insurance distribution has started in hingoli nanded districts too, read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.