Lokmat Agro >शेतशिवार > Pik Vima : पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Pik Vima : पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Latest news Pik Vima crop insurance is not received or is less Read in detail | Pik Vima : पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Pik Vima : पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Pik Vima : जर आपल्याला पीक विमा (Crop Insurance) कमी मिळाला असेल, मिळाला नसेल किंवा त्यांच्या संदर्भातील काही आपली तक्रार असेल तर....

Pik Vima : जर आपल्याला पीक विमा (Crop Insurance) कमी मिळाला असेल, मिळाला नसेल किंवा त्यांच्या संदर्भातील काही आपली तक्रार असेल तर....

शेअर :

Join us
Join usNext

Pik Vima :  खरीप पीक विमा २०२४ (Kharip Pik Vima 2024) लातूर जिल्ह्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. जर आपल्याला पीक विमा कमी मिळाला असेल, मिळाला नसेल किंवा त्यांच्या संदर्भातील काही आपली तक्रार असेल तर या माध्यमातून तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे मांडण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. 

लातूर जिल्ह्यामध्ये (Latur District Pik Vima) जवळजवळ आठ लाख ८७ हजार पेक्षा जास्त अर्ज करण्यात आलेले होते. यातील जवळपास पाच लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून कसानीसाठी क्लेम दाखल करण्यात आलेले होते. अनेक क्लेम बाद करण्यात आले होते. क्लेम करण्यात आलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेकांना पीक विमा मिळाला. मात्र पिकविम्याच्या वाटपामध्येही तफावत आढळून आली. 

यासाठी शेतकऱ्याच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अर्थात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांना निर्देश देण्यात आलेले होते. शेतकऱ्यांसाठी तक्रार असतील, या तक्रारी गोळा करण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चार दिवस कॅम्प घेण्याचे निर्देश देण्यात आले. 

तक्रार निवारण समितीकडे तक्रार करा 
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भात पुन्हा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे माहिती पाठवण्यासाठी कार्यवाही करण्यास सांगितले. याबाबतचे एक पत्रही जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले. या समितीने अपात्र केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत ०६ मे, ०७ मे , १४ मे आणि १५ मे या दिवशी शिबिर आयोजित करून शेतकऱ्याकडून प्राप्त तक्रारीची पडताळणी करावी. त्याबाबत तालुकास्तरीय समितीने योग्य तो निर्णय घेऊन सर्व संबंधितांना अवगत करावे. याबाबत कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना देण्यात आल्या. 

असे आले होते अर्ज 
लातूर जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. जवळपास सर्वच तालुका मधून ०५ लाख ८ हजार ३३२ ऑनलाईन क्लेम करण्यात आले होते. यांच्यापैकी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून एक लाख ११ हजार ४१ नाकारण्यात आले होते. नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत होती. 
 

Web Title: Latest news Pik Vima crop insurance is not received or is less Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.