Pik Spardha : खरीप हंगाम २०२४ मधील, एकूण १८३५ पीकस्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांची बक्षीस रक्कम रु.१ कोटी ३ लाख ३ हजार रुपये आणि रब्बी हंगाम २०२३ चे लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे समर्पित करण्यात आलेला ७२ हजार रुपयांचा निधी असा एकूण १ कोटी ३ लाख ७५ हजार रुपयांचा निधी या शासन निर्णयान्वये कृषि आयुक्तालयास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन त्यांच्याकडून आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळते.
खरीप हंगाम २०२४ मधील पीक स्पर्धांचे निकाल, विजेते संख्या व बक्षीस रक्कम माहिती
| जिल्हा | एकूण विजेते संख्या | एकूण बक्षिसांची रक्कम |
|---|---|---|
| ठाणे जिल्हा | १६४ विजेते | ०८ लाख ०६ हजार रुपये |
| नाशिक जिल्हा | २२६ विजेते | १६ लाख २२ हजार रुपये |
| पुणे जिल्हा | ३४० विजेते | २० लाख १५ हजार रुपये |
| कोल्हापूर जिल्हा | २६१ विजेते | १७ लाख ५३ हजार रुपये |
| छत्रपती संभाजी नगर | १४७ विजेते | ६ लाख ७७ हजार रुपये |
| लातूर जिल्हा | १६८ विजेते | दहा लाख ०५ हजार रुपये |
| अमरावती जिल्हा | २६६ विजेते | ११ लाख ४५ हजार रुपये |
अशी एकूण ०१ कोटी ०३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आले आहे.
