Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Pesticide Supply : कीटकनाशके अडकली गोडाऊनमध्ये; शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात वाचा सविस्तर

Pesticide Supply : कीटकनाशके अडकली गोडाऊनमध्ये; शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात वाचा सविस्तर

latest news Pesticide Supply: Pesticides stuck in godown; Farmers' production at risk Read in detail | Pesticide Supply : कीटकनाशके अडकली गोडाऊनमध्ये; शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात वाचा सविस्तर

Pesticide Supply : कीटकनाशके अडकली गोडाऊनमध्ये; शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात वाचा सविस्तर

Pesticide Supply : खरीप हंगामाचा शेवट जवळ आला असतानाही शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी लागणारी कीटकनाशके वेळेवर मिळालेली नाहीत.काय आहे कारण वाचा सविस्तर (Pesticide Supply)

Pesticide Supply : खरीप हंगामाचा शेवट जवळ आला असतानाही शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी लागणारी कीटकनाशके वेळेवर मिळालेली नाहीत.काय आहे कारण वाचा सविस्तर (Pesticide Supply)

Pesticide Supply : खरीप हंगामाचा शेवट जवळ आला असतानाही शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी लागणारी कीटकनाशके वेळेवर मिळालेली नाहीत. (Pesticide Supply)

गोदामात साठा असूनही वितरण थांबवल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी दुकानदारांकडून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. उत्पादन धोक्यात आल्याने शेतकरी संघटना संतप्त झाल्या असून, शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी होत आहे.(Pesticide Supply)

मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना कीड-रोग नियंत्रणासाठी आवश्यक कीटकनाशके वेळेवर मिळत नाहीत. यंदा पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Pesticide Supply)

शासन दरवर्षी शेतकऱ्यांना मोफत कीटकनाशके उपलब्ध करून देते; परंतु यावर्षी कृषी विभागाच्या संथ कार्यपद्धती व दुर्लक्षामुळे शेकडो शेतकरी औषधांपासून वंचित राहिल्याचा आरोप होत आहे.(Pesticide Supply)

औषधे गोदामात; मात्र वितरण थांबले

जुलैपासून शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. तरीही औषधं उपलब्ध नाहीत असे सांगून त्यांना परत पाठवले जात असल्याचा आरोप आहे. 

प्रत्यक्षात, गोदामात गेल्या महिनाभरापासून कीटकनाशकांचा साठा असूनही वितरणाला अडथळा आणला जात असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले.

मर्जीतील शेतकऱ्यांनाच लाभ?

फक्त काही ठराविक मर्जीतील शेतकऱ्यांनाच औषधं मिळत असल्याची चर्चा गावागावात आहे. अधिकारी स्वतः गोडाऊनची चावी घेऊन फिरतात आणि सामान्य शेतकऱ्यांना मुद्दाम औषधे देण्यात उशीर करतात, असा आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे.

खर्च वाढला; उत्पादन धोक्यात

मोफत कीटकनाशके वेळेवर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खासगी दुकानदारांकडून महागडी औषधे खरेदी करून फवारण्या केल्या. 

मात्र, योग्य मार्गदर्शन नसल्याने औषधे चुकीची ठरली आणि पिकांवरील कीड-रोग कमी झाले नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान तर झालेच, त्यासोबत उत्पादनही धोक्यात आले आहे.

चौकशी व तत्काळ वितरणाची मागणी

शेतकरी शरद घारे यांच्यासह अनेकांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक तीन प्रकारच्या कीटकनाशकांचे वितरण करण्यात यावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले. याप्रकरणी कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी बोलता आले नाही.

शेतकऱ्यांचा आक्रोश

कीटकनाशकांच्या कमतरतेमुळे आम्ही पिके वाचवण्यासाठी बाजारातून महागडी औषधे घेतली; पण त्याचा उपयोग झाला नाही. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी, असे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

मंठा तालुक्यात खरीप हंगामाच्या अखेरीसही शेतकऱ्यांना कीटकनाशकांसाठी धावाधाव करावी लागत आहे. विभागाने तातडीने साठा उघडून सर्व पात्र शेतकऱ्यांना औषधे उपलब्ध करून दिल्यास पिकांचे संरक्षण होऊ शकते आणि शेतकऱ्यांचा खर्चही वाया जाणार नाही.

हे ही वाचा सविस्तर : Chia Seed Market : मागणी वाढली, आवक कमी; चियाला मिळाला विक्रमी भाव वाचा सविस्तर

Web Title: latest news Pesticide Supply: Pesticides stuck in godown; Farmers' production at risk Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.