जळगाव : महावितरणकडून वीजग्राहकांना डिजिटल सेवांचा वापर वाढावा यासाठी विविध सवलतींचे प्रोत्साहन दिले जात असून, त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जळगाव परिमंडळातील वीजग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट, प्रॉम्प्ट बिल भरणा आणि 'गो-ग्रीन' पर्याय स्वीकारून जवळपास दहा कोटी रुपयांची सवलत मिळविली आहे.
परिमंडळातील विविध विभागांमध्येही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सवलतींचा लाभ घेतला आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही मंडळांतील ग्राहकांनी डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करून आर्थिक बचत केली आहे. महावितरणने वीजबिल भरणे, तक्रार नोंदविणे, नवीन वीजजोडणी अर्ज, नाव व भार बदल यांसारख्या सर्व सेवा आपल्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
या डिजिटल सुविधांमुळे ग्राहकांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचत आहे. ऑनलाइन व तत्पर वीजबिल भरणा करावा आणि 'गो-ग्रीन' पर्याय स्वीकारून सवलतींचा लाभ घ्यावा तसेच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावावा, असे आवाहन महावितरणकडून केले आहे.
काय मिळाल्या सवलती ?गेल्या आर्थिक वर्षात जळगाव परिमंडळातील ग्राहकांना एकूण ९ कोटी ९६ लाख ९४ हजार ५५१ रुपयांची सवलत मिळाली आहे. त्यात तत्पर भरणा सवलत ६ कोटी ५ लाख रुपये, डिजिटल पेमेंट सवलत १ कोटी ५० लाख रुपये आणि गो-ग्रीन सवलत २ कोटी ४१ लाख रुपये इतकी आहे.
'गो-ग्रीन' योजनेंतर्गत छापील 3 बिलाऐवजी ई-मेलवर बिल स्वीकारल्यास दरमहा दहा रुपये म्हणजेच वर्षाला १२० रुपयांची सूट दिली जाते. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना दरमहा ई-मेल आणि एसएमएसद्वारे बिल पाठविले जाते.
ग्राहकांनी बिलाच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत बिल भरल्यास (कर व शुल्क वगळून) १ टक्का तत्पर भरणा सवलत दिली जाते. तसेच नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय किंवा मोबाइल वॉलेटद्वारे ऑनलाइन बिल भरल्यास ०.२५ टक्के अतिरिक्त सवलत दिली जात आहे. अशा माध्यमांतून दहा कोटींची सवलत वीजग्राहकांना मिळाली आहे.- आय. ए. मुलाणी, मुख्य अभियंता, जळगाव परिमंडळ
रेशन दुकानातुन रेशनच नाही, आता साडीही मिळणार! जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?
Web Summary : MSEDCL incentivizes digital payments, saving Jalgaon customers ₹10 crore. Prompt online payments and Go-Green adoption offer discounts. Digital services save time and money, promoting environmental conservation. Consumers can avail discounts using Net Banking, UPI, etc.
Web Summary : महावितरण ने डिजिटल भुगतान को प्रोत्साहित किया, जिससे जलगांव के ग्राहकों को ₹10 करोड़ की बचत हुई। तुरंत ऑनलाइन भुगतान और गो-ग्रीन अपनाने पर छूट मिलती है। डिजिटल सेवाएं समय और धन बचाती हैं, पर्यावरण संरक्षण को बढ़ावा देती हैं। उपभोक्ता नेट बैंकिंग, यूपीआई आदि का उपयोग करके छूट का लाभ उठा सकते हैं।