Chief Minister's Fellowship Scheme : सन २०२५-२६ या कालावधीपासून राज्यात "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता, यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळावा यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६-२७ ची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
(अ) कार्यक्रमाची अंमलबजावणी : या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात यावी.(ब) फेलोंच्या निवडी संबंधातील निकष :(१) अर्जदार भारताचा नागरिक असावा.(२) शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा.(३) अनुभव : किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
विद्यावेतन (छात्रवृत्ती) : सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६ हजार १०० रुपये, प्रवास खर्च रुपये ५ हजार ४०० रुपये असे एकत्रित रुपये ६१ हजार ५०० रुपये छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
अतिशय महत्वाचे :
तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा आणि इतर अटी काय आहेत, यासाठी राज्य शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय पाहावा. शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
Web Summary : The Maharashtra government's Chief Minister Fellowship Program offers graduates ₹56,100 monthly plus ₹5,400 travel allowance. Applicants need a degree with 60% marks and one year's experience. Apply per government guidelines.
Web Summary : महाराष्ट्र सरकार का मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम स्नातकों को ₹56,100 मासिक और ₹5,400 यात्रा भत्ता प्रदान करता है। आवेदकों को 60% अंकों के साथ डिग्री और एक वर्ष का अनुभव होना चाहिए। सरकारी दिशानिर्देशों के अनुसार आवेदन करें।