Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Pandharpur Wari: बाभळगावचा 'देवाचा अश्व' पुन्हा एकदा वारीत दाखल; १०० वर्षांची अखंड परंपरा आजही जिवंत!

Pandharpur Wari: बाभळगावचा 'देवाचा अश्व' पुन्हा एकदा वारीत दाखल; १०० वर्षांची अखंड परंपरा आजही जिवंत!

latest news Pandharpur Wari: Babhalgaon's 'God's Horse' once again entered Pandharpur Wari; 100-year-old unbroken tradition still alive! | Pandharpur Wari: बाभळगावचा 'देवाचा अश्व' पुन्हा एकदा वारीत दाखल; १०० वर्षांची अखंड परंपरा आजही जिवंत!

Pandharpur Wari: बाभळगावचा 'देवाचा अश्व' पुन्हा एकदा वारीत दाखल; १०० वर्षांची अखंड परंपरा आजही जिवंत!

Pandharpur Wari : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेला 'देवाचा अश्व' म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा जीवंत प्रतीक. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथून या अश्वाची शंभर वर्षांपासून न चुकता निघणारी मिरवणूक आजही तेवढ्याच भक्तिभावाने काढली जाते. वाचा सविस्तर (Pandharpur Wari)

Pandharpur Wari : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेला 'देवाचा अश्व' म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा जीवंत प्रतीक. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथून या अश्वाची शंभर वर्षांपासून न चुकता निघणारी मिरवणूक आजही तेवढ्याच भक्तिभावाने काढली जाते. वाचा सविस्तर (Pandharpur Wari)

विठ्ठल भिसे

पाथरी (जि. परभणी) : संत तुकाराम महाराजांच्या पंढरपूर आषाढी वारीचा अविभाज्य भाग असलेला 'देवाचा अश्व' बाभळगाव येथून मिरवणुकीतून बुधवारी प्रस्थान झाला. (Pandharpur Wari)

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेला 'देवाचा अश्व' म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा जीवंत प्रतीक. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथून या अश्वाची शंभर वर्षांपासून न चुकता निघणारी मिरवणूक आजही तेवढ्याच भक्तिभावाने काढली जाते.(Pandharpur Wari)

रणेर घराण्याच्या निष्ठेमुळे ही अनमोल परंपरा आजही तितक्याच भक्तीभावाने सुरू आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेला 'देवाचा अश्व' म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा जीवंत प्रतीक. (Pandharpur Wari)

परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथून या अश्वाची शंभर वर्षांपासून न चुकता निघणारी मिरवणूक आजही तेवढ्याच भक्तिभावाने काढली जाते. रणेर घराण्याच्या निष्ठेमुळे ही अनमोल परंपरा आजही तितक्याच तेजाने सुरू आहे.

रणेर कुटुंबीयांची ही तब्बल १०० वर्षांची अखंड परंपरा असून, हा अश्व वारीत एक मानाचा प्रतिनिधी मानला जातो. या परंपरेची सुरुवात विनायकराव नारायणराव रणेर यांच्या हातून झाली होती. आजही त्यांचे वंशज ही सेवा अखंड भाविकतेने पुढे नेत आहेत.

वारीतील मानाचे स्थान

पंढरपूर वारीत 'देवाचा अश्व' देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होतो. तो उभ्या आणि आडव्या रिंगणातही भाग घेतो, जे वारीतील एक पवित्र क्षण मानले जाते.

हजारो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणारा हा अश्व पंढरीच्या वाटेवर भक्तिभावाने सामील होतो.

अश्वाची काळजी आणि सेवा

रणेर कुटुंबीय वर्षभर या अश्वाची सेवा करत असतात. साधारणतः प्रत्येक ८ ते ९ वर्षांनी जुना अश्व निवृत्त करून, नवीन अश्व स्वखर्चाने खरेदी केला जातो. यावेळी देखील मिरवणुकीपूर्वी गावात विशेष पूजा व विधी पार पाडले गेले.

प्रवासाची बदललेली रूपरेषा

पूर्वी बाभळगावहून पंढरपूरपर्यंत हा अश्व पायी प्रवास करत असे. मात्र सध्या तो वाहनाने पंढरपूरपर्यंत नेण्यात येतो, आणि तेथून पुढील वारीतील प्रवास पायीच केला जातो.

वारकरी संप्रदायाची श्रद्धा

वारीत अनेक मानाच्या गोष्टी असतात, परंतु 'देवाचा अश्व' हे त्यातील एक अनमोल प्रतीक मानले जाते. अश्वाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी उसळते, आणि त्याच्याभोवती विशेष भाविकतेने फेर धरले जातात.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Unique ID Cards : 'आयडी' नाही, तर मदत नाही; शासनाच्या नव्या नियमाचा काय होईल परिणाम वाचा सविस्तर

Web Title: latest news Pandharpur Wari: Babhalgaon's 'God's Horse' once again entered Pandharpur Wari; 100-year-old unbroken tradition still alive!