राजरत्न सिरसाट
राज्यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राबविलेला सोयाबीनवरील सेंद्रिय उत्पादनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. (Organic soybean cultivation)
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेतीचे सामर्थ्य दाखवत सोयाबीन उत्पादनात मोठे यश मिळवले आहे. (Organic soybean cultivation)
सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या प्रयोगातून तब्बल हेक्टरी १४ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन नोंदले गेले असून हा परिणाम सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा मार्ग दाखवणारा ठरत आहे. (Organic soybean cultivation)
अकोला विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड करून हेक्टरी तब्बल १४ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सेंद्रिय पद्धतीने घेतलेले हे उत्पादन तांत्रिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरू शकतो, असे विद्यापीठाने नमूद केले आहे.(Organic soybean cultivation)
बायोडायनामिक शेती
राज्यात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत असताना, अधिक टिकाऊ शेती पद्धतींचा शोध घेण्याचे प्रयत्न विद्यापीठात सुरू आहेत. त्यानुसार यावर्षी सेंद्रिय, नैसर्गिक आणि बायोडायनामिक पद्धतींच्या आधारे सोयाबीनवर संशोधन करण्यात आले.
* सेंद्रिय पद्धतीत – १४ क्विंटल/हेक्टर
* नैसर्गिक पद्धतीत – १२.५ क्विंटल/हेक्टर
ही दोन्ही आकडेवारी प्रायोगिक स्तरावर उल्लेखनीय मानली जात आहे.
शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय बियाणे उपलब्ध
विद्यापीठाकडून या प्रयोगात वापरलेले सेंद्रिय बियाणे लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य मिळेल.
सेंद्रिय शेती पदव्युत्तर पदविका
डॉ. पंदेकृवि येथे सुरू असलेल्या सेंद्रिय प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने सुरू आहे.
इकोसर्ट (फ्रान्स), कॉटन कनेक्ट (यूके) या पदव्युत्तर अभ्यासक्रमातून बाहेर पडणारे विद्यार्थी राज्यात सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत असून, अनेक विद्यार्थी स्वतःही सेंद्रिय शेतीचा अवलंब करीत आहेत.
शेतकऱ्यांसाठी काय लाभ?
* रासायनिक निविष्ठांचा खर्च कमी
* जमिनीची सुपीकता वाढ
* आरोग्यदायी आणि रसायनमुक्त उत्पादन
* निर्यातक्षमतेत वाढ
* पर्यावरणपूरक शेतीचा प्रसार
राज्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी विद्यापीठाकडून अशा प्रयोगांचे प्रमाण वाढवण्याचा मानस आहे.
सोयाबीनसारख्या प्रमुख पिकावर सेंद्रिय प्रयोगातून मिळालेले १४ क्विंटल/हेक्टर उत्पादन हे राज्यातील सेंद्रिय शेती क्षेत्राला नव्या शक्यता निर्माण करणारे पाऊल मानले जात आहे.
कृषी विद्यापीठाच्या संशोधन प्रक्षेत्रावर सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून सोयाबीन पिकावर यंदा यशस्वी उत्पादन घेतले गेले आहे. या यशस्वी प्रयोगाद्वारे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन घेण्याचे प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. अनिता चोरे, विभाग प्रमुख, कृषी विद्या विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.
