Join us
Daily Top 2Weekly Top 5

Orange Orchard Management : हवामान बदलाचा फटका; संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:28 IST

Orange Orchard Management : संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, महागड्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(Orange Orchard Management)

Orange Orchard Management : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आणि संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या उमरा परिसरात संत्र्याच्या झाडांवर डिंक्या (गमोसिस) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.(Orange Orchard Management)

यावर्षी अतिवृष्टी झाल्याने बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढले असून, त्यानंतर आता डिंक्या रोगाने संत्रा बागा ग्रासल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.(Orange Orchard Management)

गेल्या आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल होत असल्याने संत्रा झाडांवर विविध रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. (Orange Orchard Management)

पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने आणि हवामानातील चढउतारामुळे बुरशीजन्य रोग पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

यावर शेतकऱ्यांनी सुरुवातीला फवारण्या करून काही प्रमाणात नियंत्रण मिळवले असले, तरी आता डिंक्या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे.

मृग बहार अपयशी; आंबिया बहारही धोक्यात

यावर्षी संत्रा पिकाचा मृग बहार अपेक्षेप्रमाणे न आल्याने शेतकऱ्यांना आधीच आर्थिक फटका बसला आहे. सध्या आंबिया बहार फुटत असताना झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने फुलावस्थेतच फुलगळ होत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आहे.

डिंक्या रोगामुळे झाडाच्या खोडातून चिकट द्रव (डिंक) स्रवू लागतो. यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि हळूहळू झाड सुकण्याची शक्यता निर्माण होते. रोग वाढल्यास संपूर्ण बाग धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दुष्काळ, रोगराई आणि खर्चाचा तिहेरी फटका

आधीच मागील काळातील दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर सततची रोगराई आणि आता डिंक्या रोगामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र, वारंवार फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने खर्च वाढत असून उत्पन्न मात्र अनिश्चित बनले आहे.

आधीच पावसामुळे नुकसान झाले आहे. आता संत्र्याच्या झाडांवर डिंक्या रोग वाढला असून, औषधांच्या फवारण्या करूनही समाधानकारक परिणाम दिसत नाही. खर्च वाढत चालला आहे.- धनंजय तोमर, उमरा, शेतकरी

यावर्षी पिकांवर नवनवे संकट येत आहे. संत्र्याच्या झाडांवरील रोग कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत सापडला आहे.- सुमित खवले, शेतकरी

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून कृषी विभागाने तातडीने शेतात पाहणी करून योग्य मार्गदर्शन व औषधोपचार सुचवावेत, अशी मागणी होत आहे. वेळेवर तांत्रिक मदत आणि प्रभावी उपाययोजना न झाल्यास उमरा परिसरातील संत्रा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

संत्रा बागेतील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन

* बाधित भागाची स्वच्छता खूप महत्त्वाची.

* खोडावरील रोगट भाग तीक्ष्ण चाकूने खरडून काढा.

* निरोगी भाग दिसेपर्यंत खरडणी करावी.

* खरडलेला भाग उन्हात सुकू द्या.

हे ही वाचा सविस्तर : Mango Pest Management : आंब्याचा मोहर गळतोय का? वेळीच करा 'या' उपयायोजना

English
हिंदी सारांश
Web Title : Climate change hits orange orchards; Gummosis disease outbreak detailed.

Web Summary : Orange orchards in Umra face a severe Gummosis outbreak due to climate change and excessive rain. Farmers struggle with crop failure, increased costs, and are seeking agricultural department guidance for effective management to prevent further losses.
टॅग्स :शेती क्षेत्रपीकफळेशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन