Join us

Onion Damage : तीन एकर कांद्याचं स्वप्न…अन् पावसात वाहून गेलेलं भविष्य! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 12:34 IST

Onion Damage : आष्टी तालुक्यातील शिदेवाडी येथील महेश दरेकर यांच्या शेतातले शेकडो गोणी कांदे भिजले, कुजले आणि चिखलात गेले. मुलीच्या शिक्षणाची चिंता, मजुरांचे देणे, पेरणीचं संकट… हाती यायचं होतं उत्पन्न, पण हाती आला फक्त चिखल. हे केवळ पावसाचं नुकसान नाही, तर शेतकऱ्याच्या कष्ट पावसात वाहून गेलेलं भविष्य दिसतंय. वाचा सविस्तर (Onions Damage)

नितीन कांबळे

आष्टी तालुक्यातील शिदेवाडी येथील महेश दरेकर यांच्या शेतातले शेकडो गोणी कांदे भिजले, कुजले आणि चिखलात गेले. मुलीच्या शिक्षणाची चिंता, मजुरांचे देणे, पेरणीचं संकट… हाती यायचं होतं उत्पन्न, पण हाती आला फक्त चिखल. (Onion Damage)

हे केवळ पावसाचं नुकसान नाही, तर शेतकऱ्याच्या कष्ट  पावसात वाहून गेलेलं भविष्य दिसतंय, अशी प्रतिक्रिया बीड येथील शेतकरी महेश दरेकर यांनी दिली.  (Onion Damage)

शनिवारी दुपारी अवकाळी पावसाने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः गाठले. शिदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे कांदा पिक शेतातच सडले. बाजारात नेण्याआधी पावसामुळे कांदा शेतातच राहिला आणि आता तो चिखलात मिसळून वाहून गेला आहे.  (Onion Damage)

दरेकर यांनी ऊसनवारी करून ३ एकर क्षेत्रात पाच महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून कांदा लागवड केली होती. मेहनतीने पिकवलेला  कांदा शेवटी काढून शेतात साठवला होता. पण हवामानात सुधारणा न झाल्यामुळे तो बाजारात नेण्यास उशीर झाला.  (Onion Damage)

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास ३०० गोणी कांदा शेतातच वाहून गेला. कांद्याचा अक्षरशः चिखल झाला. या घटनेनंतर दरेकर कुटुंबीयांवर दुः खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने, प्रगतीने, चिखलात माखलेले कांदे उचलताना दिलेली भावनिक साद कोणाच्याही डोळ्यात अश्रू आणणारी ठरली.

मी आता शाळेत कशी जाणार? पप्पा माझी फी कशी भरणार? तुम्हीच मदत करा साहेब! - प्रगती दरेकर

पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली आहे. मजुरांचे पैसे देणे बाकी आहे, मुलांची फी भरायची आहे, आता पेरणीचे दिवस आलेत... खत, बी-बियाणे कुठून आणायचे? आजच्या तारखेला कांद्याचे पैसे येणे अपेक्षित होते, पण हातात फक्त चिखलच राहिला आहे. - महेश दरेकर, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Avakali Paus: पावसाने फक्त माती नाही ओली केली, तर स्वप्नंही भिजवली! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकांदापीकपाऊस