Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आज एक निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.
या पॅकेजमुळे राज्यातील सुमारे 72 ते 73 लाख बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारने हा निधी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने 29 जिल्ह्यांमधील 253 तालुक्यांना सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान 68 लाख हेक्टरवरील पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत केवळ पीक नुकसान भरपाईसाठी दिली जाईल. शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता यावे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये इतकी मदत दिली जाईल.
पीक नुकसान भरपाई
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत : 6 हजार 175 कोटी
- खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी रोख 47 हजार आणि नरेगाच्या माध्यमातून हेक्टरी 3 लाख रूपये
- कोरडवाहू शेतीसाठी : प्रति हेक्टर 18,500 रुपये.
- हंगामी बागायतीसाठी : प्रति हेक्टर 27,000 रुपये.
- बागायती शेतीसाठी : प्रति हेक्टर 32,500 रुपये
- बियाणे व इतर कामांसाठी सर्वसाधारण मदत : हेक्टरी ₹10,000
- विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये
इतर नुकसानीसाठी मदत
- नष्ट झालेली/पडझड झालेली घरे नव्याने बांधण्यासाठी मदत.
- दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत.
- विहिरींमधील गाळ काढण्यासाठी 30 हजार रुपये प्रति विहीर मदत.
- कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी याप्रमाणे मदत.
- झोपड्यांची मदत, गोठा आणि दुकानदार यांनाही 50 हजार रुपये पर्यंत मदत दिली जाईल.
- गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार
अशा पद्धतीने राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.