Join us

Nuksan Bharpai : राज्यात पावसानं शेतीपिकांची दाणादाण, शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'हे' काम करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:50 IST

Rain Crop Damage : राज्यातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेती पिकांचे अतोनात नुकसानही झाले आहे

Nuksan Bharpai : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यातील (Marathwada Rain) बहुतांश भागासह राज्यातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये शेती पिकांचे अतोनात नुकसानही झाले आहे. अशा पद्धतीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

खरीप हंगाम २०२५ मध्ये मान्सूनचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. याची प्रचिती गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मराठवाड्यातील पावसाने दाखवून दिले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. 

जर आपल्याही शेती पिकांचं नुकसान झालं असेल तर तात्काळ आपल्या कृषी सहाय्यक तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या होत असलेल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करावा. खरीप हंगाम २०२५ मध्ये जो पिक विमा दिला जाणार आहे, तो पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे. 

तरच नुकसान भरपाई ज्या महसूल मंडळामध्ये ज्या गावांमध्ये अशा प्रकारे पावसाने नुकसान होते आहे. त्या ठिकाणी पंचनामे केले जातात. नुकसानीची जी काही आकडेवारी समोर येईल. त्यामध्ये जर गाव बाधित दिसून आले, तर पुढे की पीक कापणीच्या वेळी याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. शिवाय शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात येऊ शकते. त्यासाठी सद्यस्थितीतला पंचनामा करणे गरजेचे  आहे. 

पंचनामे करून घ्या त्यामुळे या पावसामुळे ज्या काही शेतकऱ्यांचा नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ शासनाच्या कुठल्या आदेशाची वाट न पाहता आपल्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकाकडून पंचनाम्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात करा. जेणेकरून पंचनामा केल्यानंतर जेव्हा नुकसान भरपाईचा आदेश येईल तेव्हा पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 

कृषी यंत्र आणि तुषार/ठिबकसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 'ही' कागदपत्रे अपलोड करा

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसपीक विमामराठवाडामुंबईचा पाऊस