Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > आपल्या शेत जमिनीवर बटाईदाराचा कायदेशीर मालकी हक्क असतो का? वाचा सविस्तर

आपल्या शेत जमिनीवर बटाईदाराचा कायदेशीर मालकी हक्क असतो का? वाचा सविस्तर

Latest News News sharecropper have legal ownership rights over his farm land Read in detail | आपल्या शेत जमिनीवर बटाईदाराचा कायदेशीर मालकी हक्क असतो का? वाचा सविस्तर

आपल्या शेत जमिनीवर बटाईदाराचा कायदेशीर मालकी हक्क असतो का? वाचा सविस्तर

Agriculture News : बटाईदार म्हणजे असा व्यक्ती जो इतराच्या जमिनीवर शेती करतो आणि त्या बदल्यात पिकाचा काही हिस्सा जमीनमालकाला देतो.

Agriculture News : बटाईदार म्हणजे असा व्यक्ती जो इतराच्या जमिनीवर शेती करतो आणि त्या बदल्यात पिकाचा काही हिस्सा जमीनमालकाला देतो.

Batai Sheti : बटाईदार म्हणजे असा व्यक्ती जो इतराच्या जमिनीवर शेती करतो आणि त्या बदल्यात पिकाचा काही हिस्सा जमीनमालकाला देतो. या शेती पद्धतीला बटाई शेती म्हणतात.

बटाईदाराचा कायदेशीर मालकी हक्क असतो का? तर नाही. कारण बटाईदार हा फक्त "उपयोगकर्ता (user)" असतो. त्याला मालकी हक्क मिळत नाही. तो जमीन विकू शकत नाही. शिवाय  सातबारा उताऱ्यावर त्याचं नाव लागत नाही. त्याला कोणताही कायम हक्क नसतो, जोपर्यंत जमिनमालक परवानगी देतो तोपर्यंतच शेती करू शकतो.

हेही समजून घ्या : कायदेशीर बटाईसाठी काही गोष्टी आवश्यक असतात. जसे कि, लिखित करार करा (Lease / Contract Agreement), जमिनमालक आणि बटाईदार यांच्यात ११ महिन्यांचा किंवा १ वर्षाचा करार, करारपत्रावर दोघांचे स्वाक्षरी, दोन साक्षीदार, वकिलाची नोंद अनिवार्य, शेतीची माहिती - सर्वे नंबर, क्षेत्रफळ, पिकाचा वाटा यांचा उल्लेख असायला हवा. तसेच हे करार नोंदणी कार्यालयात रजिस्टर करणे अधिक सुरक्षित असते. 

महत्त्वाचे मुद्दे करारात असावेत
जसे कि, जमीन किती कालावधीसाठी दिली आहे? पिकाचा किती टक्का हिस्सा कोणाला मिळेल? खत, बी-बियाण्याचा खर्च कोण देणार? पाणी, पंप, वीज खर्च याचं वाटप, भरपाईसाठी जबाबदारी कोणाची ?

शिवाय जर बटाई जास्त कालावधीसाठी असेल, तर तलाठीकडे अर्ज देऊन सातबारावर नोंद करता येते. यामुळे बटाईदाराला काही सरकारी योजना लागू होऊ शकतात (जसे - पीक विमा). जर समजा काही किरकोळ वाद झाल्यास जमीनमालक अचानक शेती बंद करायला सांगत असल्यास कायदेशीर रक्षण होणे अवश्यक आहे, यासाठी करार पत्र महत्वाचे ठरते. 

बटाईदारासाठी लागू असणाऱ्या काही कायदेशीर बाबी 
यामध्ये 1948 चा जमीनधारण कायदा महत्वाचा असतो. या कायद्यानुसार जमीनमालक स्वतः शेती करत नसेल तर बटाईदाराला काही अटींवर कायदेशीर संरक्षण मिळू शकतं.जर बटाईदार वर्षानुवर्षे शेती करत असेल आणि जमीनमालक शेती करत नसेल तर बटाईदार कुलधारक (protected tenant) म्हणून नोंदवला जाऊ शकतो. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असते व जिल्हाधिकारी, SDO यांच्याकडे यावं लागतं.

जमिनीच्या खरेदीखताचे पेमेंट नेमके कसे करावे, रोख की चेकद्वारे, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News News sharecropper have legal ownership rights over his farm land Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.