Lokmat Agro >शेतशिवार > Nashik Jilha Bank : एकरकमी कर्ज परतफेड योजना मान्य नाही, शेतकऱ्यांच्या बैठकीत ठराव 

Nashik Jilha Bank : एकरकमी कर्ज परतफेड योजना मान्य नाही, शेतकऱ्यांच्या बैठकीत ठराव 

Latest news ndcc bank issue Nashik District Bank's arrears farmers meet in Pimpalgaon | Nashik Jilha Bank : एकरकमी कर्ज परतफेड योजना मान्य नाही, शेतकऱ्यांच्या बैठकीत ठराव 

Nashik Jilha Bank : एकरकमी कर्ज परतफेड योजना मान्य नाही, शेतकऱ्यांच्या बैठकीत ठराव 

Nashik Jilha Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची पिंपळगाव येथे बैठक पार पडली.

Nashik Jilha Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची पिंपळगाव येथे बैठक पार पडली.

शेअर :

Join us
Join usNext

Nashik Jilha Bank :  नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Nashik District Bank) 2025-26 वर्षासाठी लागू होणारे एक रकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) योजना थकबाकीदार शेतकऱ्यांना मान्य नाही. त्या ऐवजी संपूर्ण व्याज माफ करून मुद्दलाचे दहा हप्ते करून द्यावे. तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा. 

कर्जमाफी (Karjmafi) झाल्यास ते पैसे शेतकऱ्यांच्या कर्जखाती किंवा त्यांच्या सेविंग खाती देण्यात यावे, असा ठराव सर्वसाधारण सभेत बैठकीत ठराव करून घ्यावा.  तो ठराव शासनास पाठवावा अशी एक मुखी मागणी पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आला. 
  
राज्य शासनाने २३ एप्रिल रोजी मुंबई येथे अजित पवार अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे इतिवृत्त बँकेस पाठवून सर्वसाधारण सभा घेऊन त्या योजनेस सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता घ्यावी. त्यानंतर ही योजना लागू करावी. या योजने संदर्भात थकबाकीदार शेतकऱ्यांचे मते जाणून घ्यावे, असे आदेश दिले आहेत. 

सर्व शेतकरी नेते व थकबाकीर शेतकऱ्यांनी ओटीएस योजना लागू करावी. मात्र शेतकऱ्यांना संपूर्ण व्याज शासनाने भरावे. तसेच आमची कर्जमाफीची मागणी कायम असून शासनाने कर्जमाफी केल्यास जे शेतकरी कर्जाचे पैसे भरतील, यांचे पैसे राज्य शासनाने आणि बँकेने शेतकऱ्यांच्या कर्ज खाती किंवा शेतकऱ्यांच्या सेविंग खाती जमा करावेत, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. 

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त केलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी जप्त केलेल्या व लावलेली नावे आहेत, ते काढून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची नावे पुन्हा लावण्यात यावीत. शिवाय बँकेने सक्तीची कर्ज वसुली सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांची नावे लावण्यात येत आहेत, ते तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी या बैठकीमध्ये करून याचे तसे पत्र बँकेस देण्यात यावे. 

व्याज माफ करून कर्ज भरण्यासाठी त्यांच्या वारसांना मुद्दलाचे 10 हप्ते करून द्यावेत. शेतकऱ्यांना व्याज आकारताना उचल तारखेपासून व्याज करावे. सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना आपली मते मांडण्यासाठी या बैठकीस उपस्थित राहू द्यावे. ज्या शेतकऱ्यांचे खाते सील केले असतील, ते खाते ओपन करावे. या इतर मागण्या संदर्भात चर्चा करून या संदर्भात बँकेत तात्काळ पत्र घेण्यात यावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले. 

 

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी

 

Web Title: Latest news ndcc bank issue Nashik District Bank's arrears farmers meet in Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.