Lokmat Agro >शेतशिवार > Nashik Jilha Bank : सक्तीची कर्ज वसुली बंद करा अन् संपूर्ण कर्ज माफी करा, शेतकऱ्यांची मागणी 

Nashik Jilha Bank : सक्तीची कर्ज वसुली बंद करा अन् संपूर्ण कर्ज माफी करा, शेतकऱ्यांची मागणी 

Latest News Nashik Jilha Bank Stop forced loan recovery and waive off loans completely, farmers demand | Nashik Jilha Bank : सक्तीची कर्ज वसुली बंद करा अन् संपूर्ण कर्ज माफी करा, शेतकऱ्यांची मागणी 

Nashik Jilha Bank : सक्तीची कर्ज वसुली बंद करा अन् संपूर्ण कर्ज माफी करा, शेतकऱ्यांची मागणी 

Nashik Jilha Bank : आदिवासी सहकारी संस्था तसेच जिल्ह्यातील शेतकरी संघटना यांच्या नाशिक येथील बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

Nashik Jilha Bank : आदिवासी सहकारी संस्था तसेच जिल्ह्यातील शेतकरी संघटना यांच्या नाशिक येथील बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

शेअर :

Join us
Join usNext

Nashik Jilha Bank :  नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीचे (Nashik Jilha Bank) कर्ज वसुली बंद करावी. तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या फक्त मुद्दल घ्यावे,  संपूर्ण व्याज शासनाने (Karjmafi) भरावे, या मागणीवर शेतकरी समन्वय समिती व ९३८ आदिवासी सहकारी संस्था तसेच जिल्ह्यातील शेतकरी संघटना यांच्या नाशिक येथील बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

आजच्या बैठकीत राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यानी ११ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये (Nashik District Bank) शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण व्याज माफ करावे, मुद्दलाचे १० हफ्ते करून द्यावे. याविषयी व कर्ज वसुलीस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिलेल्या स्थगिती तसेच मुंबई येथे झालेल्या माणिकराव कोकाटे यांचे निर्णयावर शेतकरी ठाम आहेत.    
    
मात्र अजित दादा पवार यांनी २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत एक लाखापर्यंत दोन टक्के व्याज, दोन ते तीन लाखापर्यंत तीन टक्के व्याज, ५ ते १० लाखापर्यंत चार टक्के व्याज व दहा लाखाच्या पुढे पाच टक्के व्याज असे आकारले जाईल. यास या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी विरोध करण्यात आला. शेतकऱ्यांचे संपूर्ण व्याज माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुद्दलाचे दहा हप्ते करून द्यावे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, असे ठरविण्यात आले. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सहकार मंत्री आदिवासी विकास मंत्री यांचे भेट घेण्याचे ठरले. 

संपूर्ण व्याज माफ करावे
तत्पूर्वी नाशिक येथे शेतकरी संघटनांचे नेत्यांसह उपस्थित शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यानुसार शेतकऱ्यांचे संपूर्ण व्याज माफ करावे, मुद्दलाचे १० हफ्ते करून द्यावे. असे शेतकऱ्यांचे मत ठरले.या बैठकीस भगवान बोराडे  शेतकरी समन्वय समिती, कैलास बोरसे ९३८ आदिवासी सहकारी संस्था राज्य अध्यक्ष, दिलीप पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. 

Web Title: Latest News Nashik Jilha Bank Stop forced loan recovery and waive off loans completely, farmers demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.