Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'या' ग्रामपंचायतींना मिळणार गावठाण विस्तारासाठी जमीनी, वाचा सविस्तर 

राज्यातील 'या' ग्रामपंचायतींना मिळणार गावठाण विस्तारासाठी जमीनी, वाचा सविस्तर 

Latest news Nashik Grampanchayat these Gram Panchayats in maharashtra will get land for village station expansion, read in detail | राज्यातील 'या' ग्रामपंचायतींना मिळणार गावठाण विस्तारासाठी जमीनी, वाचा सविस्तर 

राज्यातील 'या' ग्रामपंचायतींना मिळणार गावठाण विस्तारासाठी जमीनी, वाचा सविस्तर 

Gavthan Jamini : ग्रामपंचायतींना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन गावठाण विस्तारीकरण करण्यासाठी मिळणार आहे.

Gavthan Jamini : ग्रामपंचायतींना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन गावठाण विस्तारीकरण करण्यासाठी मिळणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Gavthan Jamini :   नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका, जिल्हा नाशिक येथील परिशिष्ट "अ" मध्ये नमूद ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची २८.३ हे. आर जमीन गावठाण विस्तारीकरण या सार्वजनिक प्रयोजनार्थ भूसंपादन कायद्यातील प्रचलीत तरतुदीनुसार नुकसान भरपाई रक्कम महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे जमा करण्याच्या अधिन राहून, तसेच अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमीनी विविध प्रयोजनासाठी विनामुल्य प्रदान करता येणार नाही. तसेच अत्यावश्यक सार्वजनिक प्रयोजनासाठी इतर पर्यायी जमिनींची उपलब्धता नसेल त्या परिस्थितीमध्ये महामंडळाच्या जमीनीच्या आवश्यकता असल्यास, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या पूर्व मान्यतेने, भूसंपादन कायद्यातील प्रचलीत तरतुदी नुसार नुकसान भरपाई रक्कम प्रदान करण्याच्या अटीवर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

परिशिष्ट "अ" मध्ये नमूद ११ ग्रामपंचायतींना जमिनींचा ताबा देण्यास उपविभागीय अधिकारी, मालेगाव यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील जळगाव गावातील गट नं. ९१ मधील २.०० हे.आर क्षेत्र मागणी केलेलं आहे. 

  • ढवळेश्वर गाव गट नं. १०५ मधील २.०० हे.आर क्षेत्र
  • अजंग गाव गट नं. ८९/अ, ८९/ब व ४१० मधील ४.०० हे.आर क्षेत्र
  • काष्ट्टी गाव गट नं. २४८ मधील २.०० हे.आर क्षेत्र
  • बेळगाव गाव गट नं. ८२ मधील २.०० हे.आर क्षेत्र
  • निळगव्हाण गाव गट नं. ५४ मधील २.०० हे.आर क्षेत्र
  • दाभाडी गाव गट नं. ३२१ मधील ३.५८ हे.आर क्षेत्र
  • दूंधे गाव गट नं. २१७ मधील २.०० हे.आर क्षेत्र
  • आघार बु गाव गट नं. ३७६ मधील २.४४ हे.आर क्षेत्र
  • रावळगाव गट नं. २७१/२ मधील ४.२८ हे.आर क्षेत्र
  • सातमाने गाव गट नं. ४६ मधील २.०० हे.आर क्षेत्र

 

असे एकूण २८. ३ हे. आर क्षेत्र गावठाण विस्तारासाठी या ग्रामपंचायतींना देण्यात येणार  आहेत. याबाबतच्या संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन पहा... संपूर्ण शासन निर्णय

Web Title: Latest news Nashik Grampanchayat these Gram Panchayats in maharashtra will get land for village station expansion, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.