Muradpur Upsa Irrigation Scheme : शेतीला पाणी हवेच, आणि ते जर सौरऊर्जेच्या (Solar Powered) साहाय्याने मोफत मिळाले, तर ते शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदानच ठरते. मुरादपूर येथील उपसा सिंचन योजना याचे उत्तम उदाहरण ठरेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते या अभिनव प्रकल्पाचे उद्घाटन झाले. (Muradpur Upsa Irrigation Scheme)
सौरऊर्जेवर चालणाऱ्या या योजनेमुळे ४६५ एकर क्षेत्र बारमाही सिंचनाखाली येणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुरादपूर येथे सौरऊर्जेवर आधारित आधुनिक उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. (Muradpur Upsa Irrigation Scheme)
तरंगत्या सोलर पॅनल्सद्वारे चालणारी ही योजना ४६५ एकर क्षेत्राला बारमाही पाणीपुरवठा करणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना स्वस्त, पर्यावरणपूरक आणि सातत्यपूर्ण सिंचनाची सुविधा मिळणार असून, यामुळे उत्पादन आणि नफा वाढणार आहे. (Muradpur Upsa Irrigation Scheme)
उमरेड तालुक्यातील वडगाव जलाशयावर (वेणा नदीवर) उभारलेल्या मुरादपूर उपसा सिंचन योजना आहे. यावेळी आमदार संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, सरपंच दुर्गा आलाम, उपसरपंच गजानन गाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Muradpur Upsa Irrigation Scheme)
या योजनेत रामा डॅमच्या पाण्यात तरंगते सौर पॅनल्स बसवले असून, त्याद्वारे निर्मित वीज एमएसईबीला (MSCB) जोडली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन योजनेवरील वीजबिलाचा खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे. एकाच कंट्रोल रूममधून संपूर्ण शेतक्षेत्रात ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
४६५ एकर शेतजमिनीला बारमाही पाणी मिळणार असून, यामध्ये पाणीवापर संस्थेचे व्यवस्थापन केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
गडकरी यांनी शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी (Farmer Producer Company) तयार करून ड्रोन, ट्रॅक्टर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे उत्पादन वाढून खर्चात बचत होईल असे त्यांनी सांगितले.
गडकरींनी यावेळी १०० कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची माहिती दिली. या गावात मोफत पाणी, वीज, सिमेंटचे रस्ते, घरांची सुविधा, मैदान व उद्यान असेल. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याचेही सांगितले.
स्मार्ट व्हिलेज लवकरच
शंभर कोटी रुपयांमध्ये दहा एकर जागेवर स्मार्ट व्हिलेज बांधायला घेतले आहे. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. ४०० लोकांनी घरांसाठी नोंदणीही केली आहे. त्यात एक हजार लोकांना घरे देणार आहोत.
४५० चौरस फुटाचे घर, सिमेंटचे रस्ते, आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत देण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी खेळाचे मैदान आणि उद्यानही असेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
मुरादपूर उपसा सिंचन योजनेची वैशिष्ट्ये
* रामा डॅमच्या जलाशयात तरंगते सोलर पॅनल्स.
* सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती होईल व ते एमएसईबीला जोडले जाणार असल्यामुळे योजनेवरील वीज बिलांचा भार कमी राहणार.
* प्रत्येकाच्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची सोय.
* एका कंट्रोल रूममधून संपूर्ण क्षेत्रात पाणीवाटप.
* संपूर्ण प्रकल्पावर पाणीवापर संस्थेचे नियंत्रण.
* ४६५ एकर शेतजमीनीला बारमाही पाणी उपलब्ध होईल.