Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > MPSC Advertisement : पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

MPSC Advertisement : पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

Latest News MPSC Advertisement Recruitment for 2795 posts of Livestock Development Officer see application process | MPSC Advertisement : पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

MPSC Advertisement : पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

MPSC Advertisement : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ (Livestock Development Officer) या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत.

MPSC Advertisement : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ (Livestock Development Officer) या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत.

मुंबई : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ (Livestock Development Officer) या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)  देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट :https://mpsconline.gov.in/candidate

  • एकूण रिक्त जागा : 2795
  • पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
  • शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी.
  • वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee : खुला प्रवर्ग :394 रुपये  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : 294 रुपये]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025

Web Title: Latest News MPSC Advertisement Recruitment for 2795 posts of Livestock Development Officer see application process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.