Join us

Mirchi Pik : अवकाळीमुळे पूर्वहंगामी मिरचीला मिळाले जीवदान! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:44 IST

Mirchi Pik : मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस (Unseasonal Weather) बरसत असल्याने पूर्वहंगामी मिरची (Pre-Season Chillies) पिक बहरले आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर (Mirchi Pik)

Mirchi Pik : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे (Unseasonal Weather) उन्हाळी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी पूर्वहंगामी मिरचीला (Pre-Season Chillies) मात्र जीवनदान मिळाले आहे.  (Mirchi Pik)

शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलमध्ये केलेल्या मिरची लागवडीला काही काळ ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमानाचा तडाखा बसला होता. यामुळे अनेक भागांतील रोपे करपून गेली होती. मात्र, मागील आठवड्याभरात वातावरण ढगाळ राहिल्यामुळे आणि अधूनमधून पाऊस झाल्यामुळे मिरचीची रोपे टवटवीत होऊन पीक  (Mirchi Pik) बहरण्यास सुरुवात झाली आहे.  (Pre-Season Chillies)

घाटनांद्रातील पेडगाव, चारणेरवाडी, धारला आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च करून मिरचीची लागवड केली आहे.  (Mirchi Pik)

पूर्वी पारंपरिक पिकांत अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने गेल्या २० वर्षांपासून या भागातील शेतकरी मिरचीकडे वळले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून मिरचीने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे. (Pre-Season Chillies)

सध्या घाटनांद्रात मिरचीला स्थानिक बाजारात ४० ते ४५ रुपये किलोचा भाव मिळत आहे. मुंबई बाजारात याच मिरचीला ५० ते ६० रुपये किलोपर्यंत दर मिळतो आहे. त्यामुळे दरवाढीची शक्यता पाहता शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

मिरची पिकाला फायदा

या वर्षी मी दोन एकर क्षेत्रामध्ये पूर्वहंगामी मिरचीची लागवड केली आहे. सुरुवातीला पाण्याअभावी रोपे करपत होती. मात्र, सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला फायदा झाला आहे. त्यामुळे हे पीक सध्या बहरले आहे.  - खुशाल पंडित, शेतकरी

असा मिळतोय बाजारात दर

* घाटनांद्रा व परिसरातून उत्पादित झालेल्या पूर्व हंगामी मिरचीला स्थानिक बाजारात सध्या ४० ते ४५ रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहेत. * मुंबई येथे मात्र प्रति किलो ५० ते ६० रुपयांचा भाव हिख्या मिस्चीला मिळत आहे. पुढील काही दिवसांत दरामध्ये वाढ होण्याची उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Bajarbhav: हळदीला 'सुवर्ण' दर; 'या' बाजारात मिळतोय विक्रम भाव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीशेतकरीशेतीहवामान अंदाजपाऊस