Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mahavistar AI App : शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे मोठी झेप; ‘महाविस्तार’ ॲपला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:25 IST

Mahavistar AI App : 'महाविस्तार' ॲपला मराठवाड्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल वेगाने सुरू झाली आहे. लाखो शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी करत डिजिटल शेतीचा स्वीकार केला आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर आणि बीडसारखे जिल्हे राज्यातील टॉप टेनमध्ये झळकले आहेत.(Mahavistar AI App)

बाळासाहेब माने

राज्य कृषी विभागाच्या महाविस्तार ॲप या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, २० मार्च २०२६ पर्यंत तब्बल ३६ लाख ७७ हजार ९७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. डिजिटल शेतीकडे वाटचाल करणाऱ्या या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे.(Mahavistar AI App)

मराठवाड्याची दमदार कामगिरी

नोंदणीच्या बाबतीत मराठवाड्यातील जिल्ह्यांनी विशेष कामगिरी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्हे राज्यातील 'टॉप टेन'मध्ये स्थान पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. धाराशिव जिल्ह्यातूनही ९३,७०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एकूण शेतकऱ्यांपैकी किमान ३० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ॲपचे फायदे काय?

'महाविस्तार' ॲप हे एआय-आधारित असून शेतकऱ्यांना खालील सुविधा उपलब्ध करून देते

* हवामानाचा अचूक अंदाज

* कीड व रोग नियंत्रणाविषयी मार्गदर्शन

* बाजारभावाची अद्ययावत माहिती

* पेरणीपासून विक्रीपर्यंत सर्व शासकीय योजनांचा थेट लाभ

या माध्यमातून कृषी विस्तार यंत्रणेला गती मिळून शेतकऱ्यांपर्यंत माहिती जलद पोहोचवण्याचा उद्देश आहे.

तांत्रिक अडथळे ठरतायत अडसर

जरी ॲपला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात काही अडचणी समोर येत आहेत

* इंटरनेटचा कमी वेग

* लॉगिनसाठी ओटीपी वेळेवर न मिळणे

* ॲपमधील क्लिष्ट तांत्रिक भाषा

* मार्गदर्शनासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणेचा अभाव

यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

काय म्हणतात अधिकारी आणि शेतकरी?

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्या मते, हे ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरून हवामान, बाजारभाव आणि कीड नियंत्रणाबाबत अचूक माहिती देणार आहे. तर काही शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणी दूर करण्याची गरज व्यक्त केली आहे.

'महाविस्तार' उपक्रमामुळे राज्यातील शेती अधिक डिजिटल आणि आधुनिक होत असली, तरी तांत्रिक अडचणी दूर करणे अत्यावश्यक आहे. या समस्या सोडवल्यास हा उपक्रम खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Mahavistar AI App : शेतीसाठी मोबाईलवरच 'एआय गुरू'; 'महाविस्तार ॲप'ने लाखो शेतकऱ्यांची केली मदत

अधिक वाचा : AI Farming : परंपरेला टेक्नॉलॉजीची जोड; 'एआय' गुढीने वेधलं सगळ्यांचं लक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : Mahavistar AI App: Farmers embrace technology, receiving tremendous response.

Web Summary : Maharashtra's Mahavistar AI app sees huge farmer registration. It offers weather updates, pest control, market prices, and government scheme access. Despite technical issues, farmers find it useful for modernizing agriculture.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेतीमराठवाडा