Mahadbt Biyane : कृषि विभागा मार्फत खरीप हंगाम (Kharif Season) करिता 100 टक्के अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण करण्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात आले होते. प्राप्तअर्जा मधून आज दि. 03 जून 2025 रोजी सोडत काढण्यात आली असून निवड झालेल्या लाभार्थ्यांना संदेश पाठविण्यात आलेले आहेत.
महाडीबीटी शेतकरी (Mahadbt Portal) योजना पोर्टलद्वारे खरीप हंगाम (Kharif Season) 2025 करिता बियाणे सोडत काढण्यात आलेली असून निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पुढील 5 दिवसांमध्ये तालुका कृषी विभागा मध्ये संपर्क साधून त्यांनी सांगितलेल्या कृषी केंद्र वरून आपले बियाणे उचल करावे.
ज्यांची निवड झाली आहे, अशा लाभार्थ्यांना कृषि विभागा मार्फत बियाणे (Biyane Sodat) उचल करणे लवकरच पुढील मार्गदर्शन करण्यात येईल. आपल्या गावाची निवड यादी पाहण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर भेट द्या. या ठिकाणी गावनिहाय, तालुकानिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शिवाय कृषी सहाय्यकांशी संपर्क करा.
असा मॅसेज आला आहे का?
आपली सोयाबीन या घटकासाठी निवड झाली आहे. सदर घटकाचा लाभ घेणेसाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, आजपासून ५ दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा, अन्यथा आपली निवड रद्द होईल. आपण एकदाच बियाणे उचल करावयाची आहे, अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाण्याची किंमत वसूल पात्र आहे