MahaDBT Anudan : सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था यांचे निवडणुका जाहीर झालेल्या असुन आचारसंहिता लागु झालेली आहे. सदर आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुर्वसंमती प्रदान करावी किंवा कसे याबाबतीत क्षेत्रिय स्तरावरून विचारणा होत आहे.
या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पुर्वसंमती प्रदान करून अनुदान अदा करण्याची कार्यवाही करण्यास हरकत नाही, अशा सूचना कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.
कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषि विकास योजना (DPR Based) कृषि यांत्रिकीकरण या तीन योजना महा-डीबीटी पोर्टलवर राज्यात राबविल्या जात आहेत. सदर योजनेतुन सन २०२५-२६ मध्ये लाभार्थ्यांची प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या पध्दतीने निवड करण्यात आलेली आहे.
कृषि यांत्रिकीकरण योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती दिली जाते, ज्यात काही अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असते. या अटींमध्ये यंत्रांचा वापर केवळ शेतीसाठीच करणे, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आणि कॅशलेस पद्धतीने खरेदी करणे यांचा समावेश आहे.
