Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 'या' फवारणीसाठी कृषी विभागाचा परवाना बंधनकारक, काय आहे नवीन निर्णय 

'या' फवारणीसाठी कृषी विभागाचा परवाना बंधनकारक, काय आहे नवीन निर्णय 

Latest News license from the Agriculture Department is mandatory for spraying pesticides | 'या' फवारणीसाठी कृषी विभागाचा परवाना बंधनकारक, काय आहे नवीन निर्णय 

'या' फवारणीसाठी कृषी विभागाचा परवाना बंधनकारक, काय आहे नवीन निर्णय 

Agriculture News : त्वरीत परवाने घेण्याचे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी केले आहे.

Agriculture News : त्वरीत परवाने घेण्याचे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी केले आहे.

मुंबई : कृषी विभागाकडून मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये किटकनाशके साठा विक्री व घरगुती किटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. 

परंतू शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक विक्रेते घरगुती किटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट, बझार इत्यादी) विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. 

तरी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये सर्व विक्रेत्यांनी किटकनाशके साठा विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती किटकनाशके विक्री व किटकनाशके फवारणी करणेसाठी त्वरीत परवाने घेण्याचे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या किटकनाशके कायदा १९६८ व किटकनाशके नियम १९७१ अन्यये किटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती किटकनाशके विक्री व किटकनाशके फवारणी करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. घरगुती किटकनाशके साठा व विक्रीचे परवाने किटकनाशक नियमानुसार कायमस्वरुपी देण्यात येतात. 

परवान्यांमधील उगम प्रमाणपत्रे व्यपगत झाल्यास परवान्यामध्ये समाविष्ट करुन घेणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधित किटकनाशके वापरासाठी  परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करणे किटकनाशके अधिनियम १९७१ चा नियम १० चे उल्लंघन आहे.

विनापरवाना किटकनाशके, घरगुती वापरासाठीची (उदा. झुरळ, उंदीर, ढेकूण, मच्छर, डास, मुंग्या इत्यादी नियंत्रण) किटकनाशके यांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे. 

तरी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांतील सर्व विक्रेत्यांनी किटकनाशके साठा च विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती किटकनाशके विक्री व किटकनाशके फवारणी करणेसाठी परवाने त्वरित घ्यावेत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन  कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे, ७ वा मजला, धर्मवीर आनंद प्रशासकीय इमारत, कशीश पार्क, एल.बी.एस मार्ग, तीन हात नाक्याजवळ, ठाणे (पश्चिम) ४००६०४ संपर्क क्रमांक ८६९१०५८०९४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी केले आहे.

Web Title : कीटनाशक छिड़काव के लिए लाइसेंस अनिवार्य: कृषि विभाग का नया निर्णय

Web Summary : मुंबई, ठाणे में कीटनाशक विक्रेताओं और छिड़काव करने वालों को लाइसेंस की आवश्यकता है। कृषि विभाग ने अनधिकृत बिक्री और संचालन के खिलाफ चेतावनी दी है, कानूनी कार्रवाई से बचने के लिए तत्काल अनुपालन का आग्रह किया है। अधिक जानकारी के लिए कृषि कार्यालय से संपर्क करें।

Web Title : License Mandatory for Pesticide Spraying: New Agriculture Department Decision

Web Summary : Pesticide stockists, sellers, and applicators in Mumbai, Thane need licenses. The Agriculture Department warns against unauthorized sales and operations, urging immediate compliance to avoid legal action. Contact agriculture office for more details.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.